बुलडाणा :शिवसेनेचा महावितरणच्या कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:50 AM2017-12-29T00:50:57+5:302017-12-29T00:51:14+5:30

बुलडाणा: शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची खंडित केलेली वीज जोडणी त्वरित जोडून देत पूर्ण क्षमतेने वी जपुरवठा करण्यात यावा, ही मागणी घेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Buldhana: Shivsena stays in the office of MSEDCL | बुलडाणा :शिवसेनेचा महावितरणच्या कार्यालयात ठिय्या

बुलडाणा :शिवसेनेचा महावितरणच्या कार्यालयात ठिय्या

Next
ठळक मुद्देशेतकर्‍यांची वीज तोडल्यात तीव्र आंदोलन - बुधवत

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची खंडित केलेली वीज जोडणी त्वरित जोडून देत पूर्ण क्षमतेने वी जपुरवठा करण्यात यावा, ही मागणी घेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, शेतकर्‍यांची वीज जोडणी तोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला आहे. २८ डिसेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये उप जिल्हाप्रमुख संजय गायकवाड, भोजराज पाटील, तालुका प्रमुख डॉ. मधुसूदन सावळे, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, लखन गाडेकर, सिंधू सपकाळ, विजय जायभाये, उमेश कापूरे, दीपक सोनुने, कैलास माळी, राजू पवार, सुधाकर आघाव, दिलीप सिनकर यांच्यासह अन्य सहभागी झाले होते. यावेळी बुधवत यांनी शेतकर्‍यांचा वीज पुरवठा तोडू नये, वीज जोडणी पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी केली. प्रसंगी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

महावितरणचे आश्‍वासन
अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांनी आंदोलकांशी चर्चा करत यापुढे शेतकर्‍यांचा रब्बी हंगामात कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडणार नाही, असे  आश्‍वासन दिले. 

Web Title: Buldhana: Shivsena stays in the office of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.