बुलडाणा : पद्मावत चित्रपटाविरोधात करणी सेनेचा रास्ता रोको; पोलिसांची तारांबळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:10 AM2018-01-26T02:10:18+5:302018-01-26T02:12:08+5:30

बुलडाणा : पद्मावत चित्रपटाविरोधात बुलडाण्यानजीक सावळा फाट्यावर राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्यावतीने गुरुवारी दुपारी रास्ता रोको करण्यात आला. चित्रपटाचे नाव बदलण्यात आले असले तरी राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी भूमिका घेत हा रास्ता रोको करण्यात आला.

Buldhana: Stop the way of action against Padmavat film; Police! | बुलडाणा : पद्मावत चित्रपटाविरोधात करणी सेनेचा रास्ता रोको; पोलिसांची तारांबळ!

बुलडाणा : पद्मावत चित्रपटाविरोधात करणी सेनेचा रास्ता रोको; पोलिसांची तारांबळ!

Next
ठळक मुद्देसावळा फाट्यावर रास्ता रोकोचत्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पद्मावत चित्रपटाविरोधात बुलडाण्यानजीक सावळा फाट्यावर राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्यावतीने गुरुवारी दुपारी रास्ता रोको करण्यात आला. चित्रपटाचे नाव बदलण्यात आले असले तरी राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी भूमिका घेत हा रास्ता रोको करण्यात आला.
बुलडाणा जिल्ह्यातील चित्रपटगृह मालकांनी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार नसल्याचे जरी सांगितले असले, तरी राज्यात तो प्रदर्शित होऊ नये, ही रास्ता रोको करणार्‍यांची भूमिका होती. या रास्ता रोकोमध्ये करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषीकेश सोळंकी, जिल्हा महसचिव ईश्‍वरसिंग चंदेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक राजपूत, पृथ्वीराज राजपूत, सतीश राजपूत, विनोद राजपूत, गजानन राजपूत, मंगलसिंग राजपूत यांच्यासह अन्य सहभागी झाले होते.   अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांनी तारांबळ उडाली होती.
दुसरीकडे गुरूवारी मोताळा तालुक्यातही करणी सेनेच्यावतीने दुपारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत हा बंद होता. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. दुपारपर्र्यंत मोताळ्य़ातील व्यापारी पेठ पूर्णत: बंद होत्या. यासंदर्भात बुधवारी सायंकाळी राष्ट्रीय करणी सेना, शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षाच्या नावाने मोताळा शहरात पत्रके वाटण्यात आली होती.

Web Title: Buldhana: Stop the way of action against Padmavat film; Police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.