ओडीसातील दुर्घटनेत बुलढाण्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू; गणपती आगमनाच्या मिरवणुकीत लागला वीजेचा धक्का
By संदीप वानखेडे | Published: September 20, 2023 08:24 PM2023-09-20T20:24:22+5:302023-09-20T20:25:04+5:30
साेहन भगवान सावळे असे मृतक युवकाचे नाव आहे.
बुलढाणा : गणेश स्थापना मिरवणुकीदरम्यान झेंड्याच्या लाेखंडी राॅड उच्चदाब विज वाहिन्यांच्या तारांना लागल्याने विद्यार्थ्यांना विजेचा धक्का लागला. यामध्ये बुलढाणा शहरातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. साेहन भगवान सावळे असे मृतक युवकाचे नाव आहे.
ओडिशा राज्यातील कटक शहरात साेहन सावळे हा योगामध्ये एमएससी करीत होता. त्याच्या महाविद्यालयात मंगळवारी गणेशाची स्थापना करण्यात आली. त्यापूर्वी गाजत वाजत मिरवणूक काढण्यात आली. सोहम ट्राॅलीवर आपल्या काही सहकाऱ्यासह चढला होता. दरम्यान यावेळी फडकविण्यात येणाऱ्या भगव्या ध्वजाचा अल्युमिनियमचा असलेल्या राॅडचा उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला स्पर्श झाला. यामुळे सोहमसह काही युवक ट्राली मधून खाली कोसळले. यात सोहम जागीच ठार झाला. याची माहिती कळताच सावळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.