बुलडाणा पोलिस अधीक्षकांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 06:25 PM2018-08-04T18:25:22+5:302018-08-04T18:26:37+5:30
बुलडाणा : शशिकूमार मीना यांच्या कार्यपध्दतीप्रमाणेच यापुढील काळात चांगले काम करण्याचा मानस व्यक्त करीत अवैध धंद्यांचा समूळ नायनाट करणार असल्याची रोखठोक भूमिका पोलिस अधीक्षक डी.के. पाटील भुजबळ यांनी व्यक्त केली.
बुलडाणा : शशिकूमार मीना यांच्या कार्यपध्दतीप्रमाणेच यापुढील काळात चांगले काम करण्याचा मानस व्यक्त करीत अवैध धंद्यांचा समूळ नायनाट करणार असल्याची रोखठोक भूमिका पोलिस अधीक्षक डी.के. पाटील भुजबळ यांनी व्यक्त केली. पोलिस अधीक्षक म्हणून ४ आॅगस्ट रोजी पदभार स्वीकारल्यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले की, गोंदिया जिल्ह्याचा बराच भाग नक्षलग्रस्त होता. तेथील समस्या, काम करण्याची पध्दती वेगळी होती. बुलडाणा जिल्हा विस्ताराने मोठा आहे. इथले प्रश्न, इथल्या समस्या वेगळ्या आहेत. येणाºया काळात नवीन आव्हाने स्वीकारुन जोमाने काम करणार आहे. पोलिस कर्मचाºयांबद्दल बोलताना ते म्हणाले, पोलिस कर्मचारी हा पोलिस दलाचा पाठीचा कणा आहे. त्यांचे मनोबल उंचावून त्यांच्याकडून अधिक चांगले काम करुन घेण्याला प्राधान्य राहील. समाजात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी पुढाकार राहील. शशिकूमार मीना यांनी पुष्पगुच्छ देवून नवीन पोलिस अधीक्षकांचे स्वागत केले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे, पोलिस उपविभागीय अधिकारी बी. बी. महामुनी, भाऊसाहेब सातपुते उपस्थित होते.