बुलडाणा : ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांचा अधिकार्याला घेराव; तीव्र आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:47 PM2018-01-15T23:47:42+5:302018-01-15T23:48:02+5:30
बुलडाणा: गेल्या अनेक वर्षांपासून मौजे पांढरदेव, एकलारा, बोरगाव काकडे येथील शेतकर्यांच्या शेतामध्ये महाराष्ट्र ईस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनीने टॉवर उभारणीचे काम केले होते. या कामामध्ये अनेक शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत; परंतु त्या शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही, त्यामुळे शेतकर्यांना त्यांचा मोबदला मिळावा, यासाठी १५ जानेवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकार्यांना घेराव घालण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या ज्या कर्मचार्यांकडे महाराष्ट्र ईस्टर्न ग्रिड पॉवर ट्रान्समिशन कंपनीचे टॉवर उभारणीचे काम होते, त्या कर्मचार्यांना धारेवर धरून पांढरदेव, एकलारा व बोरगाव काकडे येथील शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी सदर आंदोलन करण्यात आले.
पांढरदेव, एकलारा व बोरगाव काकडे येथील शेतकर्यांना शासनाकडून जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे. अशाच प्रकारे शासनाने शेतकर्यांच्या जमिनीवर आज रोजी याच कंपनीने अनेक टॉवर उभे केले आहेत; परंतू आतापर्यंत शेतकर्यांना कंपनीने तोकडी मदत देऊन टॉवर उभारणीचे काम केले आहे. म्हणून शासनाने या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन महाराष्ट्र ईस्टर्न ग्रिड पॉवर ट्रान्समिशन कंपनीच्या चुकीच्या निर्णयाने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. म्हणून कंपनीला शासनाने तत्काळ आदेश देऊन शेतकर्यांचा राहिलेला मोबदला त्यांना मिळवून द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी आंदोलनामध्ये अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफिक शेख करीम, कडूबा मोरे, अमीन खसाब, शेख वसीम, मो. साजीद, सैय्यद जहीरोद्दीन, शुत्रुघ्न तुपकर, समाधान धंदर, गोपाल जोशी, रामेश्वर जाधव यांच्यासह पांढरदेव, एकलारा, बोरगाव काकडे येथील शेतकरी उपस्थित होते.