बुलढाणा : श्री संस्थानच्या आवारातील वटवृक्ष कोसळला...
By सदानंद सिरसाट | Published: May 17, 2024 06:17 PM2024-05-17T18:17:50+5:302024-05-17T18:18:43+5:30
सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
शेगाव : विदर्भ पंढरी असलेल्या श्री गजानन महाराज संस्थानचे परिसरातील ३० वर्षे जुने वडाचे झाड वादळी वाऱ्यामुळे गुरुवारी सायंकाळी मुळासकट उन्मळून पडले. मात्र, कुठलीही जीवितहानी झाली नाही.
गुरुवारी सायंकाळी शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला. वाऱ्याच्या झोतात श्री गजानन महाराज मंदिर परिसरात इमारतीला लागून असलेले ३० वर्षे जुने वडाचे झाड मुळासकट कोसळले. दर गुरुवारी सायंकाळी या वडाच्या बाजूलाच काही फूट अंतरावर श्रींची पालखी दर्शनार्थ ठेवलेली असते. यावेळीही पालखी यास्थळी होती. त्यामुळे भाविकांची गर्दी होती. वटवृक्ष कोसळल्याने कुठलीही हानी झाली नाही. या ठिकाणी उपस्थित भाविक काही क्षणातच आजूबाजूला आडोशाला गेले. वटवृक्ष कोसळत असताना अनेकांची धावपळही झाली. काहींनी श्रींचा जयघोष केला.