Buldhana: तेरा वर्षीय अपहृत बालकाचा खून, दोघांना अटक  

By विवेक चांदुरकर | Published: July 25, 2024 11:49 PM2024-07-25T23:49:20+5:302024-07-25T23:49:38+5:30

Buldhana Crime News:

Buldhana: Thirteen-year-old abducted boy murdered, two arrested   | Buldhana: तेरा वर्षीय अपहृत बालकाचा खून, दोघांना अटक  

Buldhana: तेरा वर्षीय अपहृत बालकाचा खून, दोघांना अटक  

शेगाव (बुलढाणा) : शहरातून अपहरण झालेल्या एका तेरा वर्षे पाच महिने वयाच्या बालकाचा निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह जंगलात टाकून दिल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुलाच्या अपहरणानंतर खंडणीच्या माध्यमातून त्याचे वडिलांकडून पैसे उकळण्याचा आरोपींचा प्रयत्न होता, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिली.

शेगाव तालुक्यातील नागझरी येथील क्रिष्णा राजेश्वर कराळे हा इयत्ता आठवीमध्ये शेगावात शिक्षण घेत होता. हा मुलगा शेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात असलेल्या शिकवणी वर्गाला आला होता. याबाबत मुलाच्या नातेवाइकांनी शहर पोलिस स्टेशनला मुलगा बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली. सगळीकडे शोधाशोध केली. मात्र, मुलगा दिसला नाही. याबाबत सर्वत्र शोध घेतला असता तो आढळून न आल्याने शेवटी त्याचे काका गोपाळ देवीदास कराळे यांनी शेगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये कोणीतरी अज्ञात आरोपीने माझा पुतण्या कृष्णा राजेश्वर कराळे याचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यावरून पोलिसांनी कलम १३७ (२) अन्वये अपहरणचा गुन्हा दाखल केला होता. २३ जुलै रोजी त्याचे गावातीलच रूपेश वरोकार (वय २२) याने अपहरण केल्याचे सीसीटीव्ही फुटेजनुसार समजले.

पोलिसांनी तपासामध्ये एका आरोपीला जळगाव जामोद येथे २४ जुलै रोजी संध्याकाळी अटक केली. त्याने सांगितलेल्या लोकेशननुसार भेंडवळ, भास्तन शिवारामध्ये पोलिसांनी बालकाचे सर्च ऑपरेशन केले. मात्र रात्र असल्यामुळे मुलाचा शोध लागला नव्हता. त्यानंतर २५ जुलै रोजी सकाळी परत शोधमोहीम सुरू झाली व आरोपीने सांगितल्यानुसार पोलिसांना घटनास्थळ गवसले. भेंडवळ रस्त्यावरील एका नाल्यामध्ये आरोपींनी बालकाचा खून करून मृतदेह टाकून दिलेला आढळला. या प्रकरणी अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच आरोपीच्या संख्येत वाढ होणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिली. बालकाला गावातीलच मुख्य आरोपी रूपेश वरोकार तसेच पृथ्वीराज मोरे यांनी संगनमत करून ठार मारल्याचे उघडकीस आले आहे. हा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला, हे अद्याप उघड झालेले नसले तरी लवकरच ते समोर येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितले.

Web Title: Buldhana: Thirteen-year-old abducted boy murdered, two arrested  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.