पंचायतराज सशक्तीकरण अभियानात बुलडाणा अव्वल
By admin | Published: October 3, 2016 02:57 AM2016-10-03T02:57:36+5:302016-10-03T02:57:36+5:30
जिल्ह्यातील ८८.९६ टक्के काम पुर्ण झाले असून ८६९ पैकी ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत.
हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. 0२- पंचायतराज बळकटीकरणासाठी केंद्र शासनाने पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू केले असून ग्रामीण भागाचा उद्धार जास्तीत जास्त प्रमाणात कसा केला जाईल, या उद्देशाने या अभियानांतर्गत काम करण्यात येते. या अभियानांतर्गत अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याने अव्वल स्थान प्राप्त केले असून ८६९ ग्राम पंचायतींपैकी ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत.
ग्रामीण प्रशासन आणि सामाजिक, आर्थिक विकास पंचायत महत्त्वाची भूमिका १९५0 पासून ओळखली गेली आहे. पंचायतच्या योजनांचा लाभ लोकांना पोहोचवण्याची खात्री करणे शासनाला महत्त्वाचे वाटते. म्हणून पंचायत बळकट करण्यासाठीची गरज, समाजकल्याण आणि समाविष्ट कार्यक्रमांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येतो. याबाबत ग्रामपंचायतीयच्या कामाचे मूल्यमापन ऑनलाइन भरण्यात येते.
या कामात अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याचे प्रथम स्थान मिळविले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ८६९ ग्रामपंचायतीपैकी ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील १२१0 ग्राम पंचायतींपैकी ३४ ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्याची टक्केवारी २.८0 आहे.
अकोला जिल्ह्यातील ७ तालुक्यातील ५४२ ग्रामपंचायतींपैकी फक्त ९ ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्याची टक्केवारी २.६६ आहे. वाशिम जिल्ह्यातील ६ तालुक्या तील ४९३ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्याची टक्केवारी ३ आहे. तर अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांतर्गत येणार्या ८४३ ग्रामपंचायतीं पैकी फक्त १0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्यांची टक्केवारी १.१८ आहे.
ऑनलाइन ग्रामपंचायतींमुळे कामाला गती
अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यातील ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांची माहिती त्वरित वरिष्ठांकडे पाठविण्याच्या कामाला गती आली आहे. या माध्यमातून कामकाजात येणार्या अडचणी सोडविण्यावर भर देण्यात येत असून खर्या अर्थाने बुलडाणा जिल्ह्यात डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.