पंचायतराज सशक्तीकरण अभियानात बुलडाणा अव्वल
By admin | Published: October 3, 2016 04:38 AM2016-10-03T04:38:32+5:302016-10-03T04:38:32+5:30
पंचायतराज बळकटीकरणासाठी केंद्र शासनाने पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू केले
हर्षनंदन वाघ,
बुलडाणा- पंचायतराज बळकटीकरणासाठी केंद्र शासनाने पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू केले असून ग्रामीण भागाचा विकास कसा केला जाईल, या उद्देशाने या अभियानांतर्गत काम केले जाते. यात अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याने अव्वल स्थान प्राप्त केले असून ८६९पैकी ८६० ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्या.
पंचायत बळकट करण्यासाठीची गरज, समाजकल्याण आणि समाविष्ट कार्यक्रमांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येतो. याबाबत ग्रामपंचायतीयच्या कामाचे मूल्यमापन आॅनलाईन भरण्यात येते. बुलडाणा जिल्ह्यापाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुक्यांतील १२१०पैकी ३४ ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्या असून अकोला जिल्ह्यात ७ तालुक्यांतील ५४२पैकी फक्त ९ ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात ६ तालुक्यांतील ४९३पैकी १५ ग्रामपंचायती तर अमरावती जिल्ह्यात १४ तालुक्यांतंर्गंत ८४३पैकी फक्त १० ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्या आहेत. (प्रतिनिधी)