बुलडाणा : मलकापूर तालुक्यातील तालसवाडा फाट्याजवळ ट्रक-कारचा अपघात; तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:30 IST2018-01-21T23:13:35+5:302018-01-22T00:30:44+5:30
मलकापूर (बुलडाणा) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालसवाडा फाट्याजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत कारमधील तिघे ठार तर तीन जण गंभिर जखमी झाल्याची घटना रविवारी, २१ जानेवारी रोजी रात्री ९.१५ वाजेदरम्यान घडली. अपघातातील कुटूंब हे धुळ्यावरुन अकोला येथे जात होते.

बुलडाणा : मलकापूर तालुक्यातील तालसवाडा फाट्याजवळ ट्रक-कारचा अपघात; तीन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर, (जि. बुलडाणा) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालसवाडा फाट्याजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत कारमधील तिघे ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ९.१५ वाजेदरम्यान घडली.
धुळे येथील तुलसानी कुटुंब अकोला येथे राधास्वामी सत्संगासाठी एम.एच.0४- ए.आर. ४७0५ क्रमांकाच्या कारने जात होते. तालसवाडा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणार्या जी.जे.0३-ए.पी. २७0७ क्रमांकाच्या ट्रकने कारला जोरात धडक दिली. त्यामध्ये कारमधील रुमा महेशलाल तुलसानी (४0), नवीन परशराम तुलसानी (२२), करिश्मा दुसेजा (२0) हे जागीच ठार झाले, तर निशा तुलसानी(५0), भूमी तुलसानी(१३), जुही तुलसानी (१४) हे गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ, दसरखेड ग्रामीणचे पोलीस कर्मचारी, डॉ. सुभाष तलरेजा, संतोष तलरेजा, महेंद्र तलरेजा, राजपाल यांच्यासह सिंधी बांधव घटनास्थळी दाखल झाले. दोन मुलांना उपचारार्थ मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात, तर महिलेला अकोला येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर घटनास् थळावरून ट्रक चालकाने पलायन केले. पोलिसांनी नाकेबंदी केल्याची माहि ती असून फरार ट्रक चालकाचा शोध सुरु केला आहे.