बुलडाणा : राजूर घाटातील पाणी वाघजाळ धरणात वळवा - विजयराज शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 08:31 PM2018-01-21T20:31:16+5:302018-01-21T20:38:46+5:30
मोताळा : नदीजोड प्रकल्प किंवा जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राजूर घाटातील पाणी वाघजाळ धरणात वळविण्याची मागणी लोकनेते विजयराज शिंदे व वाघजाळ, टाकळी व वारुळी ह्या गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा (बुलडाणा): मलकापूर रस्त्यावरील मुर्ती फाट्याला लागून असलेल्या वाघजाळ धरणात पावसाचे वाहून येणारे पाणी कमी येत असल्याने सदर धरण भरत नाही . त्यामुळे नदीजोड प्रकल्प किंवा जलयुक्त शिवार योजने अंतर्गत राजूर घाटातील पाणी वाघजाळ धरणात वळविण्याची मागणी लोकनेते विजयराज शिंदे व वाघजाळ, टाकळी व वारुळी ह्या गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता जिल्हापरिषद सिंचन विभाग आणि कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग बुलडाणा यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वाघजाळ धरण, राजूर घाटातील नाले व त्या धरणात पावसाचे पाणी वळविण्याच्या सर्व भौगोलिक शक्यता पाहण्यासाठी राजूर व मोहेंगाव शिवाराची अधिकाºयांसह पाहाणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता काळवाघे, शाखा अभियंता विजयसिंग राजपूत, पुरुषोत्तम लखोटीया, तेजराव पाटील, महादेवराव शिराळ, कैलास पाटील, ओमसिंग राजपूत, एस .एन. पाटील, विजय पंडित, बंडू पाटील, सुभाष गाडेकर, ज्ञानदेव शिंबरे, सुधाकर शिवणेकर, शिवशंकर शिंदे, मनु पाटील, राजू पाटील, बाळू परवते, संजू सुरडकर, शत्रुघ्न वराडे, किशोर पाडळे, बंडू शिराळ, शेषराव पाटील, शंकर पाटील, सागर शिंबरे, पंडितराव शिवणेकर व अनेक गावकरी व शेतकरी उपस्थित होते