Buldhana: ‘समृद्धी’वर सहा तासांत दोन अपघातात दोन मृत्युमुखी, ११ जखमी

By निलेश जोशी | Published: November 9, 2023 07:33 PM2023-11-09T19:33:18+5:302023-11-09T19:33:47+5:30

Accident: समृद्धी महामार्गावर मेहकरनजीक फर्दापूर ते डोणगाव दरम्यान ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा तासाच्या अंतरात दोन अपघात होऊन दोन जण ठार तर ११ जण जखमी झाले आहेत. मृतकापैकी एकाची अेाळख पटली आहे.

Buldhana: Two killed, 11 injured in two accidents on 'Samriddhi' in six hours | Buldhana: ‘समृद्धी’वर सहा तासांत दोन अपघातात दोन मृत्युमुखी, ११ जखमी

Buldhana: ‘समृद्धी’वर सहा तासांत दोन अपघातात दोन मृत्युमुखी, ११ जखमी

- नीलेश जोशी
डोणगाव/ मलकापूर पांग्रा: समृद्धी महामार्गावर मेहकरनजीक फर्दापूर ते डोणगाव दरम्यान ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा तासाच्या अंतरात दोन अपघात होऊन दोन जण ठार तर ११ जण जखमी झाले आहेत. मृतकापैकी एकाची अेाळख पटली आहे. जखमींवर मेहकरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. गंभीर जखमीमध्ये एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे. पहिला अपघात खासगी प्रवासी बस व ट्रकमध्ये तर दुसरा अपघात वेग मयादा अेालांडून धावणाऱ्या कारला झाला आहे.

पहिला अपघात हा फर्दापूर टोल नाक्याजवळ पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. चाकातील हवा खासगी बस चालक तपासत असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने बसला पाठीमागील बाजूने जबर धडक दिली. त्यात बस चालकासह एक प्रवाशी ठार झाला तर सहा जण जखमी झाले होते. हरीश ठाकरे हे मृत बसचालकाचे नाव असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या मृतकाची मात्र अेाळख पटलेली नाही. दरम्यान या प्रवाशी बसमधील बाकी ३६ प्रवाशी सुरक्षीत आहेत. जखमी सात जणांंवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

एमएच-१४-एचजी-५९९९ क्रमांकाची ही खासगी प्रवाशी बस ही मुंबईकडून नागपूरकडे जात होती. चाकातील हवा कमी झाल्याचा संशय आल्याने चालकाने महामार्गाच्या कडेला बस उभी करून तपासणी करत असतानाच पाठीमागून येणाऱ्या ट्रकने बसला जबर धडक दिली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलिस व बचाव पथकाने तातडीने घटनास्थळ गाठत जखमी रुग्णांना मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. एका प्रवाशाची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. अन्य प्रवाशी किरकोळ जखमी झाले होते.

चुकीच्या ठिकाणी वाहन थांबविले
महामार्गावर चुकीच्या ठिकाणी बस थांबविल्यामुळे हा अपघात झाल्याचे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. योग्य ठिकाणी बस थांबवली असती तर दुर्घटना टळली असती.

चालकाचे नियंत्रण सुटून कारला अपघात
पहिल्या अपघातानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास नागपूरकडे जाणाऱ्या एका भरधाव वेगातील कारचे टायर फूटून रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या लोखंडी सुरक्षा कठड्याला ही कार धडकली. त्याच पाच जण जखमी झाले आहेत. यातील अडीच वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर असून त्यास नागपूर येथे हलविण्यात आले आहे. डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. जखमीमध्ये सुवर्णा चंद्रशेखर शेलोरे (२८), चंद्रशेखर गजानन शेलोरे (३०) कुणाल अरूण ठाकरे, शिवांश चंद्रशेखर शेलोरे (अडीच वर्ष, सर्व रा. नागपूर) आणि भुपेंद्र युवराज पटेले (रा. पुणी, बालाघाट, मध्यप्रदेश) अशी जखमींनी नावे आहेत. यातील शिवांश चंद्रशेखर शेलोरे हा अडीच वर्षाचा मुलाची प्रकृती अत्यवस्थ आहे. मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार डोणगाव येथील ठाणेदार अमरनाथ नागरे व सहकाऱ्यांनी समृद्धी महामार्ग गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले होते.

Web Title: Buldhana: Two killed, 11 injured in two accidents on 'Samriddhi' in six hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.