Buldhana: मोबाईल चोरासह तो विकत घेणाऱ्यालाही दणका, चोरटा व्हायरससह दोघांना दोन वर्षांचा कारावास
By सदानंद सिरसाट | Published: August 18, 2023 11:58 PM2023-08-18T23:58:47+5:302023-08-18T23:59:09+5:30
Crime: शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांस मारहाण करून त्याचा माेबाइल हिसकावणाऱ्या दोन आरोपींना दोन वर्षांच्या सश्रम कारावासासह दंड तर चोरीचा मोबाइल विकत घेणाऱ्या आरोपीला एक वर्ष कारावासासह दंडाची शिक्षा खामगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एन. भावसार यांनी गुरुवारी सुनावली.
- सदानंद सिरसाट
खामगाव - शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांस मारहाण करून त्याचा माेबाइल हिसकावणाऱ्या दोन आरोपींना दोन वर्षांच्या सश्रम कारावासासह दंड तर चोरीचा मोबाइल विकत घेणाऱ्या आरोपीला एक वर्ष कारावासासह दंडाची शिक्षा खामगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एन. भावसार यांनी गुरुवारी सुनावली.
शहरातील ओम नितीन गुजर हा विद्यार्थी २६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता शिकवणीसाठी सायकलने जात होता. त्यावेळी दुचाकीने आलेल्या दोघांनी त्याला पत्ता विचारण्यासाठी थांबवले. तसेच चापटा- बुक्क्यांनी मारहाण करून मोबाइल हिसकावला. याबाबतची तक्रार विद्यार्थ्याने शहर पोलिसात दाखल केली. तसेच खामगाव रावणटेकडी येथील आरोपी अंकुश उर्फ व्हायरस गणेशराव देशमुख (२८), दाळफैलातील शिवा मोहन धारपवार (२३) या दोघांना अटक केली.
तपासात चोरीचा मोबाइल खामगाव तालुक्यातील कंझारा येथील प्रवीण दादाराव लांडगे (२७) याने तो मोबाइल खरेदी केल्याचे पुढे आले. आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली. तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. त्यांची साक्ष तसेच सहायक सरकारी वकील सविता सविता लोखंडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अंकुश उर्फ व्हायरस गणेशराव देशमुख (२८), दाळफैलातील शिवा मोहन धारपवार (२३) या दोघांना दोन वर्षांचा कारावास तसेच एक हजार रुपये दंड तर मोबाइल खरेदी करणारा कंझारा येथील प्रवीण दांडगे याला एक वर्ष कारावास, एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.