Buldhana Vidhan Sabha Election Result 2024 Live : बुलढाण्यात अटीतटीच्या लढतीत शिंदेसेनेचे संजय गायकवाड विजयी
By दिनेश पठाडे | Updated: November 23, 2024 16:27 IST2024-11-23T16:18:56+5:302024-11-23T16:27:32+5:30
Buldhana vidhan sabha assembly election result 2024 : मतदारसंघात शिंदेसेनेचे संजय गायकवाड आणि उद्धवसेनेच्या जयश्री शेळके यांच्यामध्ये अटीतटीची लढत पहावयास मिळाली.

Buldhana Vidhan Sabha Election Result 2024 Live : बुलढाण्यात अटीतटीच्या लढतीत शिंदेसेनेचे संजय गायकवाड विजयी
बुलढाणा : मतदारसंघात शिंदेसेनेचे संजय गायकवाड आणि उद्धवसेनेच्या जयश्री शेळके यांच्यामध्ये अटीतटीची लढत पहावयास मिळाली. फेरी दर फेरीत मतांची आकडेवारी दोन्ही उमेदवारांसह समर्थकांच्या काळजाचा ठोका वाढविणारी ठरली. अतिशय चुरशीच्या लढतीत संजय गायकवाड यांनी ८४१ मतांनी विजय मिळवला. विजयी निश्चित होताच समर्थकांनी शहरात एकच जल्लोष केला.
पहिल्या पाच फेरीपर्यंत संजय गायकवाड यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर ६ व्या फेरीत जयश्री शेळके यांनी आघाडी मिळवली. सातव्या फेरीतही त्यानीच आघाडी घेतली. ८ व्या फेरीत पुन्हा संजय गायकवाड यांनी आघाडी घेतली. त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये कधी जयश्री शेळके यांनी तर कधी संजय गायकवाड यांनी आघाडी घेतली. मात्र, अखेरच्या फेऱ्यांमध्ये संजय गायकवाड यांनी सतत आघाडी घेत ८४१ मतांनी विजय मिळवला. संजय गायकवाड यांनी ९१ हजार ६६० तर जयश्री शेळके यांनी ९० हजार ८१९ मते घेतली. तर वंचितचे प्रशांत वाघमोडे यांना ७ हजार १४६ मते मिळाली.