Buldhana: रस्ता अपघातातील जखमी युवक, सामान्य रुग्णालयातून निघून गेला
By अनिल गवई | Updated: May 8, 2024 16:32 IST2024-05-08T16:31:38+5:302024-05-08T16:32:02+5:30
Buldhana Accident News: रस्ता अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी उपचारासाठी दाखल केलेला जखमी युवक प्रथमोपचारानंतर रुग्णालयातून परस्पर निघून गेला. ही घटना मंगळवारी स्थानिक सामान्य रुग्णालयात घडली.

Buldhana: रस्ता अपघातातील जखमी युवक, सामान्य रुग्णालयातून निघून गेला
- अनिल गवई
खामगाव - रस्ता अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी उपचारासाठी दाखल केलेला जखमी युवक प्रथमोपचारानंतर रुग्णालयातून परस्पर निघून गेला. ही घटना मंगळवारी स्थानिक सामान्य रुग्णालयात घडली.
प्राप्त माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील कपिल गजानन इंगळे २२ रा.कदमापूर या युवकाचा मंगळवारी दुपारी रस्ता अपघात झाला. अपघातानंतर कपिलला जखमी अवस्थेत खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दुपारी साडेतीन वाजता दाखल करण्यात आले. मात्र, प्रथमोपचारानंतर तो परस्पर निघून गेला. ही घटना बुधवारी उघडकीस आली. त्यामुळे सामान्य रुग्णालय प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. उपचारासाठी दाखल युवक परस्पर निघून गेल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने खामगाव शहर पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी उपचारादरम्यान निघून गेल्याची नोंद घेतल्याचे समजते.