बुलडाण्यात धरणे

By admin | Published: August 21, 2015 01:39 AM2015-08-21T01:39:15+5:302015-08-21T02:01:09+5:30

दाभोळकर,पानसरे यांच्या मारेक-यांना अटक करा; आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद.

Bulldoze | बुलडाण्यात धरणे

बुलडाण्यात धरणे

Next

बुलडाणा : समाजाला धार्मिक भावनेच्या नादी लावून त्यांना लुबाडणारा बाबा-बुवांचा एक मोठा वर्ग सध्या सक्रिय झालेला आहे; मात्र या बाबा-बुवांच्या मागे न लागता आपला विवेक जागृत ठेवावा. आपला खरा देव हा विज्ञान आणि विवेक आहे, असे रोखठोक प्रतिपादन सामाजिक व पुरोगामी चळवळीत काम करणारे तसेच ह्यशिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्लाह्ण या नाटकातील कलावंत राजकुमार तांगडे यांनी २0 ऑगस्ट रोजी येथे केले. डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण होऊनदेखील त्यांचे मारेकरी अद्याप पकडले गेले नसल्याच्या निषेधार्थ येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व बुलडाणा जिल्हा दारुबंदी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने व धरणे आंदोलन केले. त्यावेळी तांगडे बोलत होते. कार्यक्रमाला माजी आमदार बाबूराव पाटील, ना.जा.दांडगे, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष रामदास बारोटे, नरेंद्र लांजेवार, मृणालीनी सपकाळ, कॉ.पंजाबराव गायकवाड, पत्रकार राजेंद्र काळे, रणजितसिंग राजपूत, मीनलताई आंबेकर, जयश्रीताई शेळके, इंदुमती लहाने, दारूबंदी अभियानाचे जिल्हा संयोजक सतीश रोठे, शेतकरी संघटनेचे वामनराव जाधव, हभप कैलास महाराज आढे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.दाभोळकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा जळजळीत शब्दांत मान्यवरांनी निषेध केला व लवकरात लवकर मारेकर्‍यांना पकडण्याची मागणी केली. नरेंद्र लांजेवार, प्रा.अनिल रिंढे यांनी बाबा-बुवा करीत असलेले चमत्कार करुन दाखविले. कार्यक्रमाला डॉ.डी.जे.खेडेकर, प्रा.डॉ.कानडजे, प्रा.कि.वा.वाघ, रविंद्र इंगळे चावरेकर, डॉ.गणेश गायकवाड, प्रा.गोविंद गायकी, प्रा.रविंद्र वानखेडे, गणेश देशमुख, डॉ.इंद्रजित पाटील, नीलेश चिंचोले, मंजुताई जाधव, महेंद्र बोर्डे, दीपक सावळे, प्रा.सुनील देशमुख, प्रा.अनंत शिरसाट, अ.भा.अंनिसचे शिवाजी पाटील, गणेश निकम, शाहीर डी.आर.इंगळे, प्रवीण गीते, प्रदीप हिवाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

Web Title: Bulldoze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.