सराफा व्यावसायिकांचा मोर्चा
By admin | Published: March 9, 2016 02:36 AM2016-03-09T02:36:31+5:302016-03-09T02:36:31+5:30
उत्पादन शुल्काच्या जाचक अटी रद्द करा, या मागणीसाठी सराफा व्यवसायिकांनी काढला मोर्चा.
बुलडाणा: केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्याच्या दागिन्यांवर लावण्यात आलेल्या एक टक्का उत्पादन शुल्काच्या विरोधात तसेच उत्पादन शुल्काच्या जाचक अटी सराफा व्यावसायिकावर लादण्यात येऊ नये, यासह इतर मागण्यांसाठी ८ मार्च रोजी जिल्हा सराफ व सुवर्णकार व्यापारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सदर मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढेही दुकाने बंदच राहतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. शहरातील सराफा लाइनमधून काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व सुवर्णकार व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल वर्मा यांनी केले होते. हा मोर्चा कारंजा चौक, न्यायालय चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील शेकडो सराफा व्यावसायिक सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकार्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये सोन्यावरील कराला असोशिएशनचा विरोध नाही; परंतु सरकारने लावलेल्या उत्पादन शुल्काचा फटका देशभरातील पाच लाख व्यापारी व चाळीस लाख कारािगरांना बसणार आहे. सरकारला महसूल हवा असेल तर त्यांनी देशात दरवर्षी आयात होणार्या ९0५ टन सोन्यावर कर लावावा. कर लावण्यास असोशिएशनचा विरोध नाही; परंतु उत्पादन शुल्काच्या जाचक अटी सराफा व्यावसायिकावर लादण्यात येऊ नये. ग्राहकाची गर्दी असल्यामुळे दर दिवशी हिशेब ठेवणे कठीण जात आहे. त्यामुळे या व्यवसायाला एक्ससाइजमधून सूट देण्यात यावी, अशा मागण्या नमूद केल्या आहेत.