शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बैलगाडीचा आधार!

By Admin | Published: September 14, 2016 01:05 AM2016-09-14T01:05:08+5:302016-09-14T01:05:08+5:30

शेतीच्या कामासाठी बैलगाडीचा वापर करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार शेतक-यांनी दर्शविली पसंती!

Bullock cart basis for the economic prosperity of the farmers | शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बैलगाडीचा आधार!

शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बैलगाडीचा आधार!

googlenewsNext

नीलेश शहाकार
बुलडाणा, दि. १३: शेतीची आधुनिकतेकडे वाटचाल सुरु असताना, जिल्ह्यातील शेतकरी जास्ती तजास्त उत्पन्न घेण्यासाठी आधुनिक वाहन आणि औजाराचा वापर करताना दिसतो; मात्र जिल्ह्यातील तब्बल १0६0 शेतकर्‍यांनी आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी बैलगाडीचा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी शासकीय स्तराहून त्यांना अनुदान ही देण्यात आले.
शेतकर्‍यांसाठी शेती औजारे देण्यासाठी विशेष घटक योजना आहे. १0 टक्के लोकवाटा भरल्यास बैलगाडी देण्याची योजना जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत राबविली जाते. यातून शेतकर्‍यांना विविध शेतीउपयोगी साहित्य अनुदान तत्त्वावर वाटप होते. जिल्ह्यातील एक हजार शेतकर्‍यांनी बैलगाडीला पसंती दर्शविली आहे.
२0१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यासाठी २ कोटी ९८ लाख ४0 हजार रुपये तरतूद बैलगाडी वाटपासाठी नियोजित आहे. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या सेवा क्षेत्र अहवालानुसार या योजनेत सहभागी जिल्ह्यात पाच बँकांकडून योजनेस पात्र ठरलेल्या तेराही तालुक्यातील खातेदार शेतकर्‍यांना बैलगाडीसाठी ऋण उपलब्ध करून देण्यात आले.

ब-याच ठिकाणी बैलगाड्या पडून
केंद्र शासनाच्यावतीने अनुसूचित जातीच्या शेतकर्‍यांसाठी विशेष घटक योजना राबविण्यात येते. या योजनेत गतवर्षी शेती ११३ शेतकर्‍यांनी बैलगाड्यांची मागणी केली. त्यानुसार प्रस्तावही घेतले. या प्रस्तावानुसार बैलगाड्या मंजूर झाल्या. २0 हजार ९00 रुपये एका बैलगाडीची किंमत आहे. त्यात लाभार्थी शेतकर्‍याचा वाटा ५ हजार ९00 रुपयांचा आहे. मंजूर झालेल्या ११३ लाभार्थ्यांंपैकी बर्‍याच लाभार्थ्यांंनी लोकवाटा भरण्यास पैसे नाहीत, त्यामुळे त्यांनी अद्याप बैलगाड्या ताब्यात घेतल्या नाहीत.

तालुका बैलगाडी लाभार्थी
बुलडाणा          १३0
चिखली              ८0
देऊळगावराजा     १७
ज.जमोद          ११५
खामगाव          ११0
लोणार             १८७
मलकापूर           ६0
मेहकर             १६६
मोताळा             0७
नांदुरा               ५१
संग्रामपूर          0४
शेगाव            १0५
सिंदखेडराजा     २८

Web Title: Bullock cart basis for the economic prosperity of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.