कृषी महोत्सवाच्या प्रचार व प्रसारार्थ शुक्रवारी खामगावात निघणार बैलगाडी दिंडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:48 AM2018-02-16T01:48:55+5:302018-02-16T01:49:58+5:30
खामगाव : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा व भव्य दिव्य असा कृषी महोत्सव प्रथमच खामगावात आयोजित करण्यात आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा व भव्य दिव्य असा कृषी महोत्सव प्रथमच खामगावात आयोजित करण्यात आला आहे. १६ फेब्रुवारी ते २0 फेब्रुवारीपयर्ंत जलंब रोडवरील पॉलीटेक्नीक कॉलेजच्या भव्य मैदानावर आयोजित या महोत्सवाच्या प्रचार व प्रसारासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावरून बैलगाडी दिंडी निघणार आहे. या दिंडीमध्ये खामगाव मतदार संघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खामगाव मतदार संघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. कृषी मेळाव्यास शेतकरी बांधव, व्यापारी व नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खामगाव मतदार संघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.