भाजपशासित राज्यांमधील मंत्र्यांच्या खांद्यावर महाराष्ट्र निवडणुकीचे ओझे

By admin | Published: September 7, 2014 12:35 AM2014-09-07T00:35:26+5:302014-09-07T00:35:26+5:30

गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढच्या मंत्र्याचा एक दिवस महाराष्ट्रातील विधानसभा एका मतदारसंघात

The burden of Maharashtra elections on the shoulders of the BJP-ruled states | भाजपशासित राज्यांमधील मंत्र्यांच्या खांद्यावर महाराष्ट्र निवडणुकीचे ओझे

भाजपशासित राज्यांमधील मंत्र्यांच्या खांद्यावर महाराष्ट्र निवडणुकीचे ओझे

Next

अनिल गवई/खामगाव
महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी चालविली असून, त्यासाठी पक्षाचे शासन असलेल्या राज्यांमधील मंत्र्यासह प्रमुख पदाधिकार्‍यावर विशेष जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच हे मंत्री व पदाधिकारी महाराष्ट्रा तील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक दिवस देणार असल्याची माहिती, विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, आता भाजपने विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांकडे मोर्चा वळविला आहे. सध्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. आता कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता ताब्यात घेण्याचा मनसुबा भाजपने रचला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाने पालक प्रतिनिधी नेमले आहेत. भाजपशासीत राज्यांमधील प्रमुख मंत्र्यांसह, पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी, तसेच राज्यातील प्रमुख नेत्यांवर विजयाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. राज्यातील लोकप्रिय नेत्यांसह, मध्य प्रदेश, व छत्तीसगड या राज्यांमधील मंत्री विधानसभा निवडणुकीत त्यांचे राजकीय कसब पणाला लावणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

** सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान मंत्री बाबुलाल गौर यांच्यावर अकोला पश्‍चिम विधानसभा म तदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघातील एक दिवसाच्या प्रचाराची धुरा खा. रावसाहेब दानवे यांच्याकडे राहणार आहे. मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाकडे लालसिंह लक्ष देतील. याशिवाय विक्रम शहा व आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे बाळापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे समजते.

** ट्रिपल वन चे सूत्र
विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व गुजरात या राज्यांमधील मंत्र्यांसह, केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रातील एका विधानसभा मतदारसंघात एक दिवस द्यावा लागणार आहे. थोडक्यात एक मंत्री-एक दिवस-एक विधानसभा मतदारसंघ असे ह्यट्रि पल वनह्णचे सूत्र राज्यात भाजपला ह्यनंबर वनह्ण बनविण्यासाठी राबविल्या जाणार आहे.

** एक दिवसाच्या प्रचारात यांचा समावेश
मध्य प्रदेशातील बाबूलाल गौर, कैलास विजयवर्गीय व सरताजसिंह, गुजरातमधील नितीनभाई पटेल, भुपेंद्रसिंह चुडासामा, बच्चुभाई खंबाड व शंकरभाई चौधरी, छत्तीसगडमधील ब्रिजमोहन अग्रवाल व राजेश मुनोत या मंत्र्यांसह, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी व परेश रावल हे खासदार असलेले चित्रपट तारेही राज्यात भाजपचा प्रचार करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
अकोला पश्‍चिमची जबाबदारी बाबूलाल गौर यांच्यावर!

Web Title: The burden of Maharashtra elections on the shoulders of the BJP-ruled states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.