चिखलीत घरफोडी; २ लाख ६९ हजार रूपयांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 03:14 PM2019-12-10T15:14:43+5:302019-12-10T15:14:52+5:30
विवेकानंद नगरमध्ये घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ६९ हजार रूपयांच्या सोन्या-चांदीचे दागीने चोरून नेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : स्थानिक खंडाळा रोड या नेहमीच्या रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या विवेकानंद नगरमध्ये घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ६९ हजार रूपयांच्या सोन्या-चांदीचे दागीने चोरून नेले आहे. ही बाब ८ डिसेंबर रोजी सायांकाळच्या सुमारास उघडकीस आली.
स्थानिक विवेकानंद नगरमधील शरद भाला हे गत पंधरा दिवसांपासून राष्टÑीय स्वंयसेवक संघाच्या शिबीरासाठी नागपूर येथे गेले होते. तर त्यांच्या कुटूंबातील सदस्य ७ व ८ डिसेंबरला शनिवार-रविवारच्या सुटीनिमित्ताने लोणार येथे गेले होते. त्यामुळे भाला यांच्या घरी कोणीच नसल्याचे हेरून अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून व घरात प्रवेशून लाखो रूपयांची सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये पाच तोळे वजनाच्या सोन्याची बिस्कटे ज्याची किंमत सुमार १ लाख ५० हजार, दोन तोळ्याचे दोन मंगळसूत्र किंमत ६० हजार, ३ सोन्याची चेन किंमत ९ हजार यांच्यासह काही चांदीचे दागीने व नगदी ५० हजार रूपये असा एकूण २ लाख ६९ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी या घडफोडीत लंपास केला आहे. दरम्यान भाला कुटूंबीय ८ डिसेंबर रोजी सांयकाळच्या सुमारास घरी आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. याबाबत चिखली पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक, फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी अनुप शरद भाला यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.