खामगावात घरफोडी; ७१ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 11:11 IST2021-05-27T11:11:32+5:302021-05-27T11:11:53+5:30
Crime News : रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने, असा एकूण ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

खामगावात घरफोडी; ७१ हजारांचा ऐवज लंपास
खामगाव : घाटपुरी रोडवरील डॉक्टरांच्या घरातील दिवसा चोरीची घटना ताजी असतानाच स्थानिक गजानन कॉलनीतील एका घरातून दिवसाढवळ्या ७१ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने, असा एकूण ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
गजानन कॉलनीतील रहिवासी अनिल भारत सावंग (४७) कुटुंबियांसोबत दाळफैल भागातील २४ मे रोजी जुन्या घरी गेले होते. दरम्यान, त्यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश मिळविला. लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ हजार रुपये रोख, असा ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.