शेकडो झाडे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:37 AM2021-03-09T04:37:17+5:302021-03-09T04:37:17+5:30
भोसा : भोसा लोणी गवळी रोडच्या लगत सामाजिक वनीकरणाअंतर्गत हजारो झाडांची लागवड करण्यात आली होती. परंंतु समाजकंटकांनी रोडलगत लावलेली ...
भोसा : भोसा लोणी गवळी रोडच्या लगत सामाजिक वनीकरणाअंतर्गत हजारो झाडांची लागवड करण्यात आली होती. परंंतु समाजकंटकांनी रोडलगत लावलेली झाडे व गवत पेटवून दिल्याने १२ ते १५ फूट उंच वाढलेली शेकडो झाडे जळून खाक झाली. विशेष म्हणजे याकडे सामाजिक वनीकरण खात्याचे दुर्लक्ष होत असल्याने मोठमोठी शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत.
या प्रकरणाची सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भोसा लोणी गवळी रस्त्यावर काहीच अंतरावर वन विभागाचे कार्यालय आहे. ही आग वन विभागाच्या कार्यालयापर्यंत गेली असती तर लाखाे रुपयांची झाडे जळून खाक झाली असती. ही झाडे जगविण्यासाठी वनमजूर कामावर असतात. परंंतु भोसा लोणी गवळी हा भाग अतिदुर्गम भागात असल्याने अशा प्रकारच्या आगी लावण्याचे प्रकार वाढत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या रोडवर आग कोणी लावली, याची सखोल चौकशी करून दोषींंवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.