बुलडाण्यात महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:23 AM2021-07-08T04:23:27+5:302021-07-08T04:23:27+5:30
राज्यपाल यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करून निलंबित केलेल्या १२ भाजपा आमदारांचे निलंबन तत्काळ रद्द करून महाविकास आघाडी ...
राज्यपाल यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करून निलंबित केलेल्या १२ भाजपा आमदारांचे निलंबन तत्काळ रद्द करून महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे एम.पी.एस.सी परीक्षा पास होऊन आत्महत्येचा बळी ठरलेल्या स्व. स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येस महाविकास आघाडी सरकार जबाबदार असून त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत मिळण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख यांनी यावेळी केली. भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपा नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दिला. यावेळी आंदोलनात किसान मोर्चा प्रदेश सचिव दीपक वारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम लाखोटीया, जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई राठी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव, विठ्ठलराव येवले, अर्जुन दांडगे, गजानन देशमुख, अल्काताई पाठक, मायाताई पदमने, डॉ.राजेश्वर उबरहंडे, विनायक भाग्यवंत, कुलदीप पवार, बाळू ठाकरे, हरिभाऊ सीनकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोताळा तालुका भाजपच्या वतीने निदर्शने
मोताळा: दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात आ. डॉ. संजय कुटे यांच्यासह भाजपाचे १२ आमदार आग्रही भूमिका मांडत होते. यावेळी अधिकाराचा गैरवापर करीत आघाडी सरकारने या १२ आमदारांना एक वर्षाकरिता निलंबित केले. सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ ५ जुलै रोजी भाजपा बुलडाणा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोताळा येथे तालुका भाजपाचे वतीने निदर्शने करण्यात आले. यावेळी तहसीलदार मोताळा यांना निवेदन देण्यात येऊन राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. भाजपा मोताळा तालुका अध्यक्ष यशवंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष मनोहर नारखेडे, गणेश जवरे, देविदास वानखेडे, एकनाथ पाटील, जि.प. सदस्य निरंजन वाढे, डॉ.वैभव इंगळे, देवराज शिंदे, विशाल व्यवहारे, दिलीप येरवाळ, गजानन घोंगडे, विकास नागवे, रामेश्वर गव्हाड पाटील, ज्ञानेश्वर साबे, गजानन पांडे, उमेश वाघ, वासुदेव मापारी, हसन शहा, बळीराम सातपुते, सुरेश सराग, मंगेश क्षीरसागर, रमेश बोरसेसर, आनंद बहुरूपे, शांताराम पाटील, भानुदास घनोकर, नीलेश मऱ्हे, नितीन अग्रवाल, बळीराम अंभोरे, डॉ. विरेंद्रसिंह राजपूत, अमोल वाढे, ओंकार बहादरे, सागर महाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.