बसच्या धडकेत वृद्धा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:11 PM2017-10-12T23:11:48+5:302017-10-12T23:12:56+5:30

मोताळा : तालुक्यातील मोहेगाव येथे   भरधाव एस. टी. ने रस्त्यालगत शौचास बसलेल्या वृद्धेस गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास धडक दिली. यामध्ये सदर महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने संतत्प झालेल्या गावक-यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने वातावरण चिघळले होते.

The bus killed the old man | बसच्या धडकेत वृद्धा ठार

बसच्या धडकेत वृद्धा ठार

Next
ठळक मुद्देसंतप्त नागरिकांचा रास्ता रोकोपोलिस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : तालुक्यातील मोहेगाव येथे   भरधाव एस. टी. ने रस्त्यालगत शौचास बसलेल्या वृद्धेस गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास धडक दिली. यामध्ये सदर महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने संतत्प झालेल्या गावक-यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने वातावरण चिघळले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.  
निमखेड कोथळी येथील सारोबाई भिला पवार (वय ७०) ही वय वृद्ध महिला तालुक्यातीलच मोहेगांव येथे आपल्या मुलींच्या घरी आली होती. सारोबाई सायंकाळी शौचास गेली असता मलकापुर-बुलढाणा मार्गावर जळगाव-चिखली एस. टी. बस एमएच ४० टी ९६५६  ने त्यांना  धडक दिली. यामध्ये सारोबाईचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गावकºयांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलन सुरू केले. यामुळे संपूर्ण रस्ता जाम झाला होता. तर या रस्त्यावरील सर्व वाहतूक ठप्प झाली होती. अर्धा तास वाहतूक ठप्प झाल्याने तब्बल अर्धा किमीपर्यंत वाहने उभी होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. तसेच बसचालक रामचंद्र गव्हाणे यांना ताब्यात घेतले आहे. या बसमध्ये १५ प्रवाशी होते. या प्रवाशांना दुसºया बसमध्ये बसवून बस बोराखेडी पोलिस ठाण्यात आणली. वृत्त लिहेपर्यत कोणत्याही प्रकारच्या गुन्हाची नोेद करण्यात आलेली नव्हती. 

Web Title: The bus killed the old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.