बस धावणार आता कॅरिअरविना

By admin | Published: May 15, 2015 01:07 AM2015-05-15T01:07:43+5:302015-05-15T01:07:43+5:30

नवे बदल; यापुढे मालवाहतूक होणार डिक्कीमधून.

The bus will not run without careers | बस धावणार आता कॅरिअरविना

बस धावणार आता कॅरिअरविना

Next

नाना हिवराळे / खामगाव : महाराष्ट्राच्या दळणवळणाची रक्तवाहिनी असलेली एस.टी. महामंडळाच्या बसचे बदलत्या काळात नवे रुपडे दिसणार आहे. गत ५५ वर्षांपासून प्रवासी सेवा देणारी बस आता कॅरिअरविना धावणार आहे. १ एप्रिल २0१५ पासून नवीन निर्माण होणार्‍या बसगाड्यांवरील कॅरिअर यापुढे पाहायला मिळणार नाही. बहुजन हिताय-बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना सेवा पुरवित आहे. लाल डबा म्हणून ओळख असणारी हीच एसटी ग्रामीण भागातील शेवटच्या गावापर्यंत पोहोचली आहे. खासगी प्रवासी गाड्या व त्यामधील सुविधा वाढली अस ताना प्रवाशांच्या हृदयात आजही बसचे अढळ स्थान आहे. अपंग, अंध, ज्येष्ठ, तसेच विद्या र्थ्यांसोबत इतरही सेवा प्रवाशांना मिळत असल्याने बसकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. सुरक्षित प्रवास केवळ बसचा असल्याचा अनुभव प्रवाशांनी अनेकदा घेतला आहे. स्पर्धेच्या बदलत्या युगात खासगी वाहनांमध्ये वेगवेगळे बदल घडत असताना बसने आपले धोरण बदलविले आहे. १ एप्रिल २0१५ पासून राज्यात परिवहन विभागाच्या निर्माण होणार्‍या नवीन गाड्यांवरील कॅरिअर हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारच्या काही बस सद्यस्थितीत धावत आहेत. एसटीच्या टपावरील कॅरिअर काढून त्यावर ठेवले जाणार्‍या लगेजसाठी वाहकाच्या बाजूला बसखाली लगेज बॉक्स बनविण्यात आला आहे. टपावर ठेवण्यात येणारी स्टेपनी (चाक) पाठीमागील बाजूस खाली ठेवण्याची जागा केली आहे. यामुळे बसचे स्वरूप खासगी वाहनासारखे झाले आहे. राज्यात सध्या साडेसतरा हजार एसटीवर कॅरिअर आहे. यापुढे निर्माण होणार्‍या गाडीवरील कॅरिअर हटविल्याने लगेज ठेवण्यासाठी प्रवासी कसे सामोरे जाणार, हे पाहण्यासारखे राहील.

Web Title: The bus will not run without careers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.