नाफेडमार्फत शेतकऱ्यांच्या मालास नापसंती तर व्यापाऱ्यांकडून निकृष्ट उडीद खरेदी
By Admin | Published: December 28, 2016 11:29 PM2016-12-28T23:29:46+5:302016-12-28T23:29:46+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत नाफेडमार्फत शेतकऱ्यांच्या शेतमालास नापसंती दर्शविण्यात येते.
> ऑनलाइन लोकमत
शेगाव, (जि.बुलडाणा), दि. 28 - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत नाफेडमार्फत शेतकऱ्यांच्या शेतमालास नापसंती दर्शविण्यात येते. मात्र ज्येष्ठ संचालक, व्यापारी प्रतिनिधी यांचे मर्जीतील व्यापाऱ्यांकडून निकृष्ट प्रतीचा उडीद, खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले असून शेतकºयांच्या तक्रारीनंतर सदर उडीद नाकारण्यात आला.
शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत नाफेडमार्फत दि महाराष्ट्र स्टेट को-आॅप. मार्केटींग फेडरेशन व्दारा उडीद या शेतमालाची शासकीय भावाप्रमाणे खरेदी सुरू आहे. याठिकाणी खरेदी-विक्री संघ शेगावचे अस्थायी लेखापाल प्रदीप साहेबराव ताथोड तर जिल्हा मार्केटींगचे प्रतिनिधी व्ही.एम. क्यावल हे दोघे शासकीय खरेदी करीत आहेत. या दोघांचे काही व्यापाºयांसोबत आर्थिक संबंध असल्याचा संशय शेतकºयांना होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावरील व्यवहारावर नजर ठेवली असता व्यापाºयांचा निकृष्ट दर्जाचा २५० क्विंटल उडिद ६ हजार २०० रूपये भावाने २८ डिसेंबर रोजी घेऊन त्याची एमएच२८-एबी८१२२ या गरीब रथामध्ये परस्पर भरून विल्लेवाट लावण्यात येत असल्याचे काही शेतकºयांच्या नजरेस आले. याबाबतची माहिती शेतकºयांनी बाजार समिती सचिव व सभापती यांना दिली असता दोघांनी ही घटनास्थळाचा पंचनामा करून नाफेडने खरेदी केलेला निकृष्ट दर्जाचा उडीद जिल्हा मार्केटींग प्रतिनिधीस रद्द करण्यास भाग पाडले.
याबाबत खरेदी विक्री संघाचे अस्थाई कर्मचारी प्रदीप ताथोड यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. प्रदीप ताथोड व व्ही.एम. क्यावल हे व्यापाºयांकडून ३०० रूपये प्रति क्विंटल जास्त घेत असल्याचे नाव न सांगण्याचे अटीवर एका व्यापाºयाने प्रतिनिधीस माहिती दिली. नाफेडतर्फे शासकीय हमी भावाने खरेदी होत असल्याने शेतकºयांनी आपल्याकडील उडीद बाजार समितीमध्ये आणला असता खरेदी विक्री संघाचे प्रतिनिधी प्रदीप ताथोड व जिल्हा मार्केटींगचे व्ही.एम. क्यावल हे शेतकऱ्यांच्या माल नापास करून फक्त व्यापाºयांकडून माल खरेदी करीत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. तर नाईलाजाने शेतकरी आपला शेतमाल व्यापाऱ्यांना कमी किंमतीत विकतात. मात्र नाफेडने नापसंद केलेला तोच माल व्यापाºयांकडून खरेदी करण्यात येतो. यासाठी ज्येष्ठ संचालक, व्यापारी प्रतिनिधी, प्रयत्नरत असतात. आतापर्यंत शेकडो टन उडीद नाफेडकडून खरेदी करण्यात येवून शेतकºयांच्या फायद्याकरीता शासनाचे उपक्रमास खरेदी विक्री संघ प्रतिनिधी प्रदीप ताथोड व जिल्हा मार्केटींग प्रतिनिधी व्ही.एम. क्यावल हे दोघे स्वत:चे स्वार्थापोटी हरताळ फासण्याचा प्रयत्न करीत आहेत. या दोघांवर कोणती कारवाई होते याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)