बुलडाणा जिल्ह्यात नाफेडकडून दोन लाख क्विंटल धान्याची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 01:29 AM2018-01-03T01:29:03+5:302018-01-03T01:29:14+5:30
शेगाव: खरीप हंगामात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने तेलबिया व कडधान्याची खरेदी प्रक्रिया पार पडली असून, बुलडाणा जिल्ह्यातील १३ खरेदी केंद्रांवर २ लाख ८ हजार ७0२ क्विंटल मालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये मूग खरेदीत शेगाव केंद्र अव्वल राहिले असून, उडीद खरेदीत दुसर्या क्रमांकावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव: खरीप हंगामात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने तेलबिया व कडधान्याची खरेदी प्रक्रिया पार पडली असून, बुलडाणा जिल्ह्यातील १३ खरेदी केंद्रांवर २ लाख ८ हजार ७0२ क्विंटल मालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये मूग खरेदीत शेगाव केंद्र अव्वल राहिले असून, उडीद खरेदीत दुसर्या क्रमांकावर आहे.
राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने सूचित केल्याप्रमाणे हंगाम २0१७-१८ मध्ये नाफेडच्या शेगाव, चिखली, मेहकर, दे. राजा, संग्रामपूर, बुलडाणा, सिं. राजा, मोताळा, मलकापूर, खामगाव, लोणार, नांदुरा, जळगाव जामोद या खरेदी केंद्रावर शेतकर्यांनी तेलबिया व कडधान्य विक्रीसाठी आणले होते. यामध्ये शेगाव केंद्र- उडीद ३२ हजार ७६९.७५ क्विंटल, चिखली- ४६ हजार ९४२.७0, मेहकर-१९ हजार ५६.0५, दे. राजा- एक हजार ८११.७८, संग्रामपूर- १ हजार ३४७.१७, बुलडाणा- ८ हजार ७८८.३६, सिं. राजा- ५ हजार ३९0.७४, मोताळा-१ हजार ४५२.७0, मलकापूर-२ हजार ८१0.५0, खामगाव-२४ हजार २४९.५0, लोणार-४ हजार ७६0.२१, नांदुरा- ३ हजार ३२२.६0, जळगाव जामोद-९८१.१६ असा एकूण १ लाख ५२ हजार ९६९.६२ क्विंटल उडीद खरेदी करण्यात आला. मूग - शेगाव-५ हजार ४६0.९५ क्विंटल, चिखली- २ हजार ६.३३, मेहकर-१ हजार ५९0.१८, दे. राजा- ५५८.५0, संग्रामपूर- ३१0.३५, बुलडाणा- १४५.६८, सि. राजा- ७३८.३३, मोताळा- ६७७.४0, मलकापूर- ११ क्विंटल, खामगाव- १ हजार ३१४.३९, लोणार- २ हजार १९३.३५, नांदुरा- ४५७, जळगाव जामोद- ५६६.२0 अशी एकूण १६ हजार ७९.६६ क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली.
सोयाबीन शेगाव केंद्र, ३ हजार ८७३.३0 क्विंटल, चिखली- ६0२.२२, मेहकर- ७८६.0६, दे. राजा-१ हजार १७0.७२, संग्रामपूर- एक हजार ५0 , बुलडाणा- ६४.८१, सि. राजा- ३७२.११, मोताळा ८११.७0, मलकापूर- ५ हजार ७४७.३0, खामगाव- ८ हजार ९५३.३४, लोणार- ५१८.७२, नांदुरा- १ हजार ४५५.५0, जळगाव जामोद- ७९९.३९ असा एकूण २६ हजार २0५.१७ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. मका खरेदी केंद्र-शेगाव केंद्र- १0७.४0 क्विंटल, संग्रामपूर-२ हजार १३६.५0, मोताळा- २७७.५0, मलकापूर- ६ हजार ६८, नांदुरा- ३९६, जळगाव जामोद- २ हजार ६५७ क्विंटल असा एकूण ११ हजार ६४२.४0 क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. हंगाम २0१७-१८ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमी भावाने मूग- ५ हजार ५७५ रुपये, उडीद- ५४00 रु. प्रति क्विंटलप्रमाणे व सोयाबीन- ३ हजार ५0 रु प्रति क्विंटलप्रमाणे दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड अंतर्गत नाफेडच्या वतीने १३ तालुक्यातील तेलबिया व कडधान्य हा शेतमाल खरेदी केला असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी सांगितले.
ऑनलाइन प्रक्रियेने काम सोपे
या करिता ३ ऑक्टोबर २0१७ पासून माल खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. ३१ डिसेंबर २0१७ पर्यंत जिल्ह्यात २ लाख ८ हजार ७0२ क्विंटल तेलबिया व कडधान्याची खरेदी झाली.
शेगावात आणखी शेतमाल पडून
अद्यापही शेगाव नाफेड गोदामात १२ हजार क्विंटल उडीद, ३ हजार क्विंटल मूग, ४.५0 क्विंटल साोयाबीनचा माल पडून असल्याचे खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक ताठे यांनी सांगितले.