खड्ड्यात हरवला जानेफळचा बायपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:50+5:302021-01-08T05:52:50+5:30
जानेफळ येथील वर्दळ पाहता संभाव्य अपघाताचा धोका टाळण्याच्या दृष्टीने गावाबाहेरून बायपास काढण्यात आलेला आहे. परंतु संबंधित विभागाचे रस्ता दुुरुस्तीकडे ...
जानेफळ येथील वर्दळ पाहता संभाव्य अपघाताचा धोका टाळण्याच्या दृष्टीने गावाबाहेरून बायपास काढण्यात आलेला आहे. परंतु संबंधित विभागाचे रस्ता दुुरुस्तीकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्यामुळे मार्गावर मोठमोठे खड्डे? पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याची अवस्था बघून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, असा प्रश्न निर्माण होत आहे. गावातील मुख्य मार्गावरच सर्व दुकाने आहेत. शाळा-कॉलेजसुद्धा या रोडलगतच आहेत. मुख्य मार्केटमुळे महिला व नागरिकांची गर्दी तसेच शाळा व कॉलेज सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. गावातील अरुंद मुख्य रस्त्यावरूनच सध्या जड वाहतूक होत असल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. सध्या दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यातच अल्पवयीन मुलांमध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहने चालविण्याची मोठी हौस जडलेली असल्याने त्यांच्या वाहनांच्या अतिवेगामुळे अपघाताची भीती अधिकच वाढलेली आहे. यामुळे बायपास मार्गाची दुरुस्ती होणेेेे अत्यंत गरजचे आहे; परंतु संबंधित विभााग याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असल्याने त्यांना एखाद्या अपघाताची प्रतीक्षा आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.