पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा फुटला; पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 05:13 PM2020-12-16T17:13:16+5:302020-12-16T17:13:56+5:30

पेनटाकळी शिवारातील गट नंबर ६५ मध्ये कॅनॉलला मंगळवारी रात्री मोठे भगदाड पडून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला.

The canal of the Pentakali project burst; Crop damage | पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा फुटला; पिकांचे नुकसान

पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा फुटला; पिकांचे नुकसान

Next

हिवरा आश्रम : प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याला मोठे भगदाड पडून त्यातून विसर्ग झालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तात्काळ या कालव्याची दुरुस्ती व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी होत आहे. कालवा फुटल्याने शेकडाे लीटर पाण्याचा अपव्यय झाला आहे.
जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाची ओळख आहे. सध्या पेनटाकळी प्रकल्प शंभर टक्के पाण्याने भरलेला आहे. या प्रकल्पावर असलेल्या ३८ किलोमीटर कालव्याच्या साह्याने शेतकऱ्यांचे शेती सिंचन होते. प्रकल्प १०० टक्के भरला असल्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा पेनटाकळी प्रकल्पाचे वक्रद्वारे उघडण्यात आले होते. यामुळे पैनगंगा नदीकाठच्या १७ गावांतील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकासह व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाच्या उदासीन धोरणामुळे या कालव्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. या कालव्याची दरवर्षी साफसफाई होत नसल्याने या कालव्यामध्ये मोठी बाभळीची, लिंबाची झाडे व गवतवर्गीय तण वाढले आहे. त्यामुळे कालव्यात पाणी थांबून राहते. याचा फटका हा इतर शेतकऱ्यांना होतो. पेनटाकळी शिवारातील गट नंबर ६५ मध्ये कॅनॉलला मंगळवारी रात्री मोठे भगदाड पडून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. यामुळे आत्माराम परशराम अवचार यांचे दोन एकरावरील आंबा, हरभरा, गजानन परसराम अवचार यांचे तीन एकरावरील चिकू, पेरू, ऊस, हरभरा या पिकांचे तर प्रभाकर माधव अवचार यांच्या दीड एकरावर हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे शेतातील संपूर्ण काळी माती वाहून गेली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पेनटाकळी येथील तलाठी ज्ञानेश्वर खरात, कृषी सहाय्यक किशोर इंगळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

शेतात पाणीच पाणी
अवचार कुटुंबीयांचे शेतात असलेले स्प्रिंकलर पाइप संच, ठिबक संचाचे नुकसान झाले. शेताला असलेले सिमेंटचे कुंपण त्याचप्रमाणे लोखंडी कुंपण हे पूर्ण पाण्यामुळे वाहून गेले. दरवर्षी या कॅनॉलची साफसफाई होणे गरजेची आहे. पाणी कॅनॉलसमोर जात नसल्याने ठिकठिकाणी सदर कॅनॉल लिकेज होतो. यामुळे कॅनॉलची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

Web Title: The canal of the Pentakali project burst; Crop damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.