धान्य वाहतूक कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करा -  जिल्हाधिकाऱ्यांचा शासनाकडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 06:12 PM2018-12-24T18:12:19+5:302018-12-24T18:14:52+5:30

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील रेशन धान्य वाहतूक घोटाळा आणि अनियमितेप्रकरणी कंत्राटदाराचा वाहतूक कंत्राट रद्द करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Cancel the contract of grain transport - Buldana Collectror;s Proposal to Government | धान्य वाहतूक कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करा -  जिल्हाधिकाऱ्यांचा शासनाकडे प्रस्ताव

धान्य वाहतूक कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करा -  जिल्हाधिकाऱ्यांचा शासनाकडे प्रस्ताव

googlenewsNext

- अनिल गवई

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील रेशन धान्य वाहतूक घोटाळा आणि अनियमितेप्रकरणी कंत्राटदाराचा वाहतूक कंत्राट रद्द करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी  ३५१ पुराव्याचा(सहपत्र) समावेश असलेला १० पानी प्रस्ताव शासनाकडे तात्काळ मंजुरीसाठी पाठविला आहे. या धक्कादायक प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांनी ११ डिसेंबर रोजी २०१८ रोजी स्वाक्षरी केल्याचे समजते.

राज्यातील गोरगरीब जनतेला त्यांच्या हक्काचे धान्य हमी स्वरुपात मिळावे. या धान्याची अफरातफर होऊ नये, यासाठी शासनाने पूर्वीची पध्दत बंद करून  सुधारीत धान्य वाहतुक व्यवस्था

अंमलात आणली. तथापि, खोटी माहीती व बनावट कागद पत्रांच्या आधारे अव्यवहारीक दरामध्ये बुलडाणा जिल्ह्यात धान्य वाहतुकीसाठी अमरावती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीने कंत्राट मिळविला. मात्र, या कंपनीकडून सुरूवातीपासूनच शासनाच्या सुधारीत धान्य व्यवस्थेच्या सर्व महत्वाच्या अटी व शर्तीचा भंग करीत धान्याची मोठ्याप्रमाणात अनियमिता व अफरातफर करण्यात आली. या संदर्भात ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला. वाहतूक कंत्राटदाराच्या सर्व गैर व्यवहार पुराव्यानिशी उघडकीस आणले. 

वाहतूक कंत्राटदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीने केलेल्या शासकीय धान्याच्या अफरातफरीचे शेगाव, शेळूद, खामगाव(शहर), खामगाव(शिवाजी नगर) साखळी प्रकरणे नमूद करून वाहतूक कंत्राटदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीने शासकीय धान्य वाहतुकीसाठी मान्यता प्राप्त वाहनातून सदरचे धान्य निर्धारीत ठिकाणी वितरण करण्याऐवजी काळ्याबाजारात विक्रीसाठी नेले. तसेच ६ किलोमीटर अंतराच्या वाहतुकीमध्ये धान्य कमी भरणे, हेतूपुरस्परपणे भरलेल्या गाड्या उभ्या करून दुसºया दिवशी गोदामावर पाठविणे, आदी गोष्टीद्वारे अनियमितता करीत जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या तरतुदींचे तसेच शासन निर्णय २६-११-२०१२ व करारनाम्यातील अट क्रमांक१४(7) व २१ नुसार दोषी आढळून आल्याने कंत्राटदाराविरोधात गुन्हे दाखल करण्याची आणि साखळी बु. प्रकरणात वाहतूक कंत्राटदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनी अफरातफरीस जबाबदार आढळून आली. त्यामुळे याप्रकरणी उपायुक्त औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन स्तरावर चौकशी सुरू असल्याचेही याप्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले.

त्याच प्रमाणे नागपूर,गोंदीया, आमगाव येथुन आणण्यात आलेला तांदूळ अनेक जिल्ह्यात पोहोचलाच नाही. तो परस्पर विकण्यात येवून कागदोपत्री रेकॉर्ड तयार करण्यात आले. यासंदर्भात खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या तक्रारींवर दीड वर्षांपासून चौकशी सुरू आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डांगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

Web Title: Cancel the contract of grain transport - Buldana Collectror;s Proposal to Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.