विना अनुदानीत शिक्षकांची निवडणुकीतील नेमणूूक रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:59+5:302020-12-31T04:32:59+5:30

महाराष्ट्र शिक्षक आघाडीच्यावतीने मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक ...

Cancel the election appointment of unsubsidized teachers | विना अनुदानीत शिक्षकांची निवडणुकीतील नेमणूूक रद्द करा

विना अनुदानीत शिक्षकांची निवडणुकीतील नेमणूूक रद्द करा

Next

महाराष्ट्र शिक्षक आघाडीच्यावतीने मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० साठी १५ जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. याची जबाबदारी विना अनुदानित शिक्षकांना देण्यात येऊ नये. कारण विना अनुदानित शिक्षकांना गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून शासनाने एक रुपयाचाही मोबदला दिलेला नाही. तरीही हे शिक्षक वेतनाच्या प्रतीक्षेत देशाची भावी पिढी घडविण्याचे कार्य इमानेइतबारे करीत आहेत. दरम्यान, स्वत:च्या कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी मिळेल ते काम तसेच छोटा मोठा व्यवसाय करतात. गत पंधरा ते वीस वर्षापासून विनावेतन काम करीत असलेले हे शिक्षक वेतनाअभावी प्रचंड आर्थिक व मानसिक ताणतणावात जगत आहेत. त्यामुळे आधीच शासनाच्या चुकीच्या धोरणाचे चटके सोसत असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामाच्या जबाबदारीमध्ये नियुक्त करणे अयोग्य तसेच अन्यायकारक ठरणार असल्याने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२० साठी विना अनुदानित शिक्षकांची झालेली नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: Cancel the election appointment of unsubsidized teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.