कॅन्सरग्रस्त आजोबांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:42+5:302021-04-29T04:26:42+5:30

दरम्यान, लोणार येथील कोविड केअर सेंटरमधून आजपर्यंत १,६७० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी ‘लवकर निदान, लवकर उपचार’ ...

Cancer-stricken grandfather overcomes corona | कॅन्सरग्रस्त आजोबांची कोरोनावर मात

कॅन्सरग्रस्त आजोबांची कोरोनावर मात

Next

दरम्यान, लोणार येथील कोविड केअर सेंटरमधून आजपर्यंत १,६७० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी ‘लवकर निदान, लवकर उपचार’ या पद्धतीला येथील डॉक्टरांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही येथे वाढत आहे. एकीकडे खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असताना तसेच महागडे इंजेक्शन व औषधी तसेच ऑक्सिजन मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीला आले आहेत. अशा स्थितीत लोणार येथील कोविड केअर सेंटर हे रुग्णांसाठी एक आशेचा किरण बनले आहे.

या कोविड केंद्रावर कार्यरत डॉ़ भास्कर मापारी, डॉ़ अनिता नागरे, डॉ़ खोडके, डॉ़ सिरसाट, डॉ़ पूजा सरकटे या डॉक्टरांसह येथे कार्यरत स्टाफ सचिन मापारी, खंडागळे, सरदार, चेके, सुरडकर, सरकटे, शिंदे, गायकवाड यांच्या गेल्या वर्षभरातील कठोर मेहनतीमुळे तब्बल १६७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़ यात उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांमध्ये तालुक्यातील देऊळगाव वायसा येथील आसाराम तारे या कॅन्सरग्रस्त ७० वर्षीय आजोबांचाही समावेश आहे. २८ एप्रिल रोजीच त्यांना सुटी मिळाली.

कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना दाखल करतेवेळी त्यांची अवस्था नाजूक होती. तारे यांच्यावर या कोविड केंद्रात कुठल्याही महागड्या औषधी किंवा इंजेक्शनचा वापर न करता केवळ औषधी गोळ्यांच्या आधारे उपचार करण्यात आले़ यासोबतच तारे यांचा दुर्दम्य आत्मविश्वास, इच्छाशक्तीचीही त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना साथ मिळाली आणि तारे आजोबांनी कोरोनाला धोबीपछाड दिला.

ते ठणठणीत बरे होऊन घरी परतल्यानंतर घरच्यांचाही आनंद द्विगुणित झाला. आपल्या बरे होण्याचे श्रेय तारे आजोबांनी कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर आणि तेथील स्टाफला दिले आहे. सोबतच महागड्या इलाजाच्या मागे न लागता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत सरकारी रुग्णालयातील सुविधांचा लाभ घेण्याचेही आजोबांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोणार तालुक्यातील येवती येथील ७५ वर्षीय आजींनीही या केंद्रातच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

९२ वर्षीय आजाेबांची काेराेनावर मात

तालुक्यातील पळसखेड येथील ९२ वर्षे वयाचे आजोबा आणि आजीसुद्धा प्रबळ इच्छाशक्ती आणि डॉक्टरांचे प्रयत्न या जोरावर कोरोनावर मात करून सुखरूप घरी गेले़ या सर्व रुग्णांच्या चेहऱ्यावर बरे झाल्यानंतर दिसणारे समाधान आम्हाला ऊर्जा देते़ त्यामुळे आम्ही अनंत अडचणी आणि त्रासात असूनही पुन्हा नव्या जोमाने रुग्णसेवा देण्यासाठी सज्ज होतो, अशी भावना यावेळी कोविड केंद्राचे मुख्य व्यवस्थापक डॉ़ भास्कर मापारी यांनी व्यक्त केली.

Web Title: Cancer-stricken grandfather overcomes corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.