तांत्रिक अडचणीमुळे उमेदवार त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:17+5:302020-12-30T04:44:17+5:30

बुलडाणा : उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एकच दिवस शिल्लक असल्याने मंगळवारी जिल्हाभरात इच्छुकांनी गर्दी केली हाेती. १३ तालुक्यांमध्ये माेठ्या ...

Candidates suffer due to technical difficulties | तांत्रिक अडचणीमुळे उमेदवार त्रस्त

तांत्रिक अडचणीमुळे उमेदवार त्रस्त

Next

बुलडाणा : उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एकच दिवस शिल्लक असल्याने मंगळवारी जिल्हाभरात इच्छुकांनी गर्दी केली हाेती. १३ तालुक्यांमध्ये माेठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. चाैथ्या दिवशी मलकापूर तालुका वगळता ४ हजार १३९ उमेदवारांनी ४ हजार २०१ उमेदवारी अर्ज दाखल केले. बुलडाणा तालुक्यात ६१८ उमेदवारांनी ६२९ अर्ज, चिखली तालुक्यात ५२६ उमेदवारांनी ५३८, देऊळगाव राजा १५६ उमेदवारांनी १६९ अर्ज, सिंदखेड राजा तालुक्यातील ३४१ उमेदवारांनी ३५४, मेहकर तालुक्यातील ४०३ उमेदवारांनी ४०९, लाेणार तालुक्यातील १०९ उमेदवारांनी १०५, खामगाव तालुक्यात ५४५ उमेदवारांनी ५५३, शेगाव तालुक्यात २३६ उमेदवारांनी २३८, जळगाव जामाेद तालुक्यात २०१ उमेदवारांनी २०१, संग्रामपूर तालुक्यातील २७४ उमेदवारांनी २७४, नांदुरा तालुक्यात २५८ उमेदवारांनी २५९ तर माेताळा तालुक्यात ४२७ उमेदवारांनी ४७२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. २८ डिसेंबर राेजी जिल्ह्यात १ हजार ११८ उमेदवारांनी १ हजार १३६ उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी आतापर्यंत ५ हजार ३४० उमेदवारांनी ५ हजार ४२५ अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाल्याने निवडणूक आयाेगाच्या वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड आला हाेता. त्यामुळे निवडणूक आयाेगाने आता ऑफलाइन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Candidates suffer due to technical difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.