उमेदवार गावात अन मतदार शेतात !
By admin | Published: October 5, 2014 12:52 AM2014-10-05T00:52:07+5:302014-10-05T00:59:30+5:30
प्रचारासाठी उमेदवार गावात मात्र शेतातील पिके जगवण्यासाठी शेतक-यांची शेताकडे धाव.
खामगाव (बुलडाणा) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार ग्रामीण भागातील म तदारांना भेटण्यासाठी दारोदार फिरत आहेत. तर दुसरीकडे शेतातील पिके जगवण्यासाठी शेतकरी शे ताकडे धाव घेत असल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसत आहे. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जागीच सुकू लागली आहेत. मरणासन्न झालेली पिके जगविण्यासाठी शेतकरी विहीर, नदी, नाल्यावरुन पाणी देण्यासाठी धडपडत आहे. मात्र वीज कं पनीच्या गलथान कारभाराने ऐन वेळेवर पुरेसा वीज पुरवठा होत नसल्याने वीज येईल तेव्हा पाणी देण्यासाठी शेतकरी शेताकडे धडपडत आहेत. कपाशी, तूर, सोयाबीन व ज्वारीची पिके जगविण्यासाठी शेतकर्यांचा आटापिटा चालला आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले सर्वच उमेदवार प्रचारासाठी गावोगाव फिरत आहेत. आमदारकीची निवडणूक अटीतटीची होत असल्याने प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहचण्याच्या प्रयत्ना त आहेत. मात्र उमेदवार गावात पोहचल्यानंतर मतदारांच्या भेटी फारच कमी होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील ९0 टक्के मतदार हा शेतकरी आहे. तेव्हा उमेदवारासोबत कार्यकर्त्यांची फौज जास्त व गावात मतदार कमी अशी अवस्था दिसून येत आहे.