५.५0 लाखांचा गांजा शेतातून जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:50 AM2017-09-08T00:50:31+5:302017-09-08T00:50:43+5:30
पिंपळगावराजा (बुलडाणा) : वसाडी रोडवरील एका शेतातील नाल्यातून एक क्विंटल दहा किलो वजनाचे पाच पोते गांजा पिंपळगावराजा पोलिसांनी ६ सप्टेंबर रोजी रात्री जप्त केला. त्याची किंमत ५ लाख ४६ हजार ६२५ रुपये एवढी आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध नारकोटिक अँक्ट अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपळगावराजा पोलीस स्टेशन हद्दीत गांजा तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची गुप्त माहिती ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांना काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. ५ सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेशोत्सव बंदोबस्त असल्यामुळे पोलीस त्या कामी व्यस्त असल्याचे पाहून या गांजा तस्करी करणार्या टोळीने आपला डाव आखला होता; परंतु त्याची कल्पना ठाणेदार अहेरकर यांना मिळाल्याने त्यांनी आपले जाळे पसरविले. याची चाहूल संबंधित गांजा तस्करांना लागल्याने त्यांनी पोलिसांच्या भीतीमुळे १ क्विंटल १0 किलो गांजाचे पाच पोते वसाडी रोडलगतच्या छगन बोंबटकार यांच्या शेतालगतच्या नाल्यात फेकून दिले. माहिती मिळाल्यावरून ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी सदर गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गांजा तस्करी प्रकरणातील मुख्य टोळी मध्य प्रदेशातील खरगोन भागातील असावी, असा कयास पोलिसांचा आहे. त्यादृष्टीने ठाणेदार अहेरकर यांनी आपली तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली आहे. गावातील कुख्यात किरकोळ गांजा विक्री करणार्याकडेसुद्धा पोलिसांचे लक्ष आहे. त्यादृष्टीने कारवाई झाल्यास जिल्हय़ातील गांजा तस्करी करणार्यांची फार मोठी टोळी पोलिसांच्या गळाला लागू शकते. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सुरेंद्र अहेरकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.