जन्मठेपेचा फरार कैदी पकडला
By Admin | Published: September 6, 2014 01:04 AM2014-09-06T01:04:40+5:302014-09-06T01:04:40+5:30
खामगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जन्मठेपेचा फरार कैद्यास अटक केली आहे.
खामगाव : खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा वरखेड येथील कै दी पॅरोलवर एक महिन्याच्या रजेवर आल्यानंतर परतला नाही. वर्षभरापासून फरार असलेल्या या कैदाला आज ५ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील वरखेड येथील भाईदास भाटे व अजय भाटे या पितापुत्रांच्या खूनप्रकरणात सहआरोपी असलेला संजय लक्ष्मण खंडेराव वय ४६ हा सध्या अमरावती अमरावती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. संजय हा २ एप्रिल २0१३ रोजी अमरावती कारागृहातून पॅरोल रजेवर बाहेर आला होता. त्याला एका महिन्यानंतर हजर होणे आवश्यक होते. मात्र तेव्हापासून तो फरराच आहे. फरार आरोपी संजय हा वरखेड येथे घरी आल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिलीप पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई केली. वरखेड येथे छापा मारुन संजय खांडेकर यास पथकाने अटक केली. सदर कारवाई पक्षकोच पीएसआय ढदुसकर, हरपालसिंग ठाकूर, किरण राऊत, विनायक मानकर, तुकाराम मोरे, महेश पाटील यांनी केले आहे.