खड्डा चुकविण्याच्या नादात कार व आॅटोरिक्षाचा अपघात; १७ प्रवाशी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 04:32 PM2019-08-25T16:32:19+5:302019-08-25T16:33:26+5:30
पुलावर पडलेला खट्टा चुकविण्याच्या नादात कार व अॅटोची धडक होऊन १७ प्रवाशी जखमी झाले आहेत.
सिंदखेडराजा: बुलडाणा तालुक्यातील साखरखेर्डा-शेंदुर्जन मार्गावर पुलावर पडलेला खट्टा चुकविण्याच्या नादात कार व अॅटोची धडक होऊन १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. अपघातातील सर्व जखमी हे पिंपरी खंदारे येथील रहिवाशी आहेत. जखमीपैकी काही किरकोळ जखमींवर साखरखेर्डा येथील रुग्णालयातच उपचार करण्यात आले.
हा अपघात २५ आॅगस्ट रोजी दुपारी घडला. दरम्यान, अपघातातील १० प्रवाशांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून अन्य किरकोळ जखमीवर साखरखेर्डा येथील प्राथिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहे. जखमी झालेल्यांमध्ये शोभा प्रल्हाद नन्हरे, कमल नामदेव केंद्रे, पार्वती दशरथ सानप (३०), प्रणिता प्रमोद व्यवहारे (१४), उर्मिला मधुकर व्यवहारे (५२), साक्षी प्रकाश उगलमुगले (५ वर्षे), अनुसया बाबुराव चौधरी (६०), अपूर्वा संतोष राऊत (१०), कासाबाई सानप (६०), समर्थ नारायण काकड (८), शारदा रामदास कायंदे (३०), कविता त्र्यंबक व्यवहारे (२७), धनंजय रामदास कायंदे (२५), शिवगंगा शिवाजी सानप (२५) यांचा समावेश आहे.
शेंदुर्जन गावानजीक असलेल्या नदीवर असलेल्या एका पुलावरच खड्डा पडलेला आहे. हा खड्डा चुकविण्याच्या नादात कार व अॅटोची धडक होऊन उपरोक्त प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.