भरधाव कार नदीपात्रात काेसळली; दाेन ठार, दाेन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 12:50 PM2020-11-04T12:50:33+5:302020-11-04T12:52:13+5:30

Buldhana Accident News दत्ता अंभाेरे व अजय शंकर इंगाेले रा.वाशिम असे मृतक युवकांची नावे आहेत.

Car crashed into a riverbed; two killed, two seriously injured | भरधाव कार नदीपात्रात काेसळली; दाेन ठार, दाेन गंभीर

भरधाव कार नदीपात्रात काेसळली; दाेन ठार, दाेन गंभीर

Next
ठळक मुद्देपुलाच्या वळण मार्गावर ही कार ५० फुट नादित काेसळली.गणेश रमेश वाघ  व ऋषीकेश दत्तात्र्य अदमाणे हे गंभीर जखमी झाले आहेत.


सुलतानपुर  : भरधाव कार पुलावरून नदीपात्रात काेसळल्याने दाेन युवक जागीच ठार तर दाेन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ४ नाेव्हेंबर राेजी घडली. याेगेश दत्ता अंभाेरे व अजय शंकर इंगाेले रा.वाशिम असे मृतक युवकांची नावे आहेत.
 वाशिम येथील चार युवक  कार क्रमांक एमएच ३२ एएच ४३६९ ने पुणे येथे जात हाेते. दरम्यान,  लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथील राज्यमहामार्गावरील सितान्हाणी पुलाच्या वळण मार्गावर ही कार ५० फुट नादित काेसळली. यामध्ये  योगेश दत्ता अंभोरे  व अजय शंकर इंगोले हे जागीच ठार झाले तर तर गणेश रमेश वाघ  व ऋषीकेश दत्तात्र्य अदमाणे हे गंभीर जखमी झाले आहेत. मागील तिन वर्षापासुन पंढरपुर - शेगांव पालखी मार्गाचे काम सुरु असून अपघात स्थळ जवळील नदिपुलाजवळील काम करणे बाकी आहे.  महामार्गावर कुठल्याही प्रकारचे सुचना फलक नसल्याने वाहन चालकास रसत्याचा अदाज येत नसल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे.

Web Title: Car crashed into a riverbed; two killed, two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.