काेराेनामुळे किडनीचे हाेतेय माेठे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:59+5:302021-06-16T04:45:59+5:30

बुलडाणा : काेराेना झालेल्या रुग्णांच्या सर्वच भागावर परिणाम हाेताे. विशेषत: शून्य ते १९ वर्षांच्या मुलांना काेराेना झाल्यास त्यांच्या किडनीवर ...

Carana causes severe damage to the kidneys! | काेराेनामुळे किडनीचे हाेतेय माेठे नुकसान!

काेराेनामुळे किडनीचे हाेतेय माेठे नुकसान!

Next

बुलडाणा : काेराेना झालेल्या रुग्णांच्या सर्वच भागावर परिणाम हाेताे. विशेषत: शून्य ते १९ वर्षांच्या मुलांना काेराेना झाल्यास त्यांच्या किडनीवर त्याचा परिणाम हाेताे. तसेच किडनीचा आजार असलेल्या रुग्णांचा मृत्यू हाेण्याचा धाेका अधिक असताे. त्यामुळे अशा रुग्णांची विशेष काळजी घेण्यात येते.

काेराेनाची दुसरी लाट ग्रामीण भागापर्यंत पाेहचली आहे. अनेक जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. काेराेना झालेल्या रुग्णांच्या रक्त, फुफ्फुसासह किडनीवरही परिणाम हाेताे. कोरोनामुक्त झालेल्या लहान बालकांना मल्टी-सिस्टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MSI-C) नावाचा आजार होत आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी धाेकादायक ठरणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यातच हा किडनीचा आजार हाेत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. लहान मुलांना काेराेना झाल्यानंतर या आजाराच्या लक्षणांकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांना काेराेनाची लागण झाली हाेती. तसेच काही लहान मुलेही पाॅझिटिव्ह आली हाेती. किडनीचा आजार असलेल्या रुग्णास काेराेना झाल्यास त्याची विशेष काळजी आराेग्य विभागाकडून घेतली जाते.

किडनीच्या रुग्णांची विशेष काळजी

किडनीचा आजार असलेल्या रुग्णास काेराेना हाेण्याची शक्यता अधिक असते.

किडनीग्रस्तांना काेराेनामुळे मृत्यू हाेण्याचा धाेका अधिक असताे. त्यामुळे आराेग्य विभागाकडून विशेष काळजी घेण्यात येते.

या रुग्णांचे डायलिसिस व इतर उपचार नियमीत करण्यात येतात. तसेच त्यांना आहाराविषयीही मार्गदर्शन करण्यात येते.

स्टेराॅईड डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे

सर्वसामान्य रुग्णांनी स्टेराॅइडचा वापर डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे फायदेशीर ठरते.

स्टेराॅईडच्या अति वापरामुळे अलीकडे म्युकरमायकाेसिसचा आजार हाेत असल्याचे समाेर आले आहे.

डाॅक्टरांनीही गरज असल्यासच स्टेराॅईड रुग्णांना देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हे करा

किडनीच्या आजार असलेल्या रुग्णांनी आहाराकडे लक्ष द्यावे.

नियमित तपासणी करावी.

किडनीचा आजार असलेल्या रुग्णांना काेराेना हाेण्याचा धाेका अधिक असताे. तसेच काेराेनामुळे मृत्यू हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे किडनीचा आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

हे करू नका

क्षारयुक्त भाेजन टाळावे.

काेराेना अंगावर काढू नये, लक्षणे दिसताच चाचणी करावी.

शून्य ते १९ वर्षांच्या मुलांना काेराेना झाल्यास त्यांच्या किडनीवर परिणाम हाेऊ शकतो. त्यामुळे किडनीच्या आजाराच्या लक्षणांकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये, तसेच त्वरित डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

काेट

किडनीच्या रुग्णांना काेराेना हाेण्याचा धाेका अधिक असताे. त्यामुळे अशा रुग्णांची विशेष काळजी घेण्यात येते. शून्य ते १९ वर्षांच्या मुलांना काेराेना झाल्यास त्यांना मल्टी-सिस्टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम हा आजार हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी लहान मुलांना काेराेना झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने डाॅक्टरांना दाखवावे.

-डाॅ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा

Web Title: Carana causes severe damage to the kidneys!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.