जिल्ह्यात ५०० कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी; चार पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:30 AM2021-01-13T05:30:01+5:302021-01-13T05:30:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. या निवडणुकीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या ५०० कर्मचाऱ्यांची ...

Carina test of 500 employees in the district; Four positives | जिल्ह्यात ५०० कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी; चार पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात ५०० कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी; चार पाॅझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. या निवडणुकीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या ५०० कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी चार जण पाॅझिटिव्ह आले आहेत. मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे शिक्षक व उमेदवारांची संख्या जास्त असल्याने काेराेना चाचणीला फाटा देण्यात आला आहे.

काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हाेत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी व उमेदवारांची काेराेना चाचणी करणे अपेक्षित हाेते. मात्र, जिल्ह्यात तब्बल ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. तसेच दाेन दिवसात माेठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची काेराेना चाचणी करणे प्रशासनाला शक्य झाले नाही. मतदान केंद्रावरही माेठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार असल्याने त्यांची काेराेना चाचणी करणे तसेच अहवाल येण्यास बराच विलंब झाला असता. उमेदवारांसाठी काेराेनाचा चाचणी ऐच्छिक हाेती. जिल्ह्यातील काही उमेदवारांनी काेराेना चाचणी केली आहे. काहींनी मात्र काेराेना चाचणीस नकार दिला आहे.

मतदान केंद्रावर सॅनिटायझर राहणार

काेराेना संसर्गाचा धाेका पाहता जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना मास्कही देण्यात येणार आहे. काेराेनाविषयक नियमांचे पालन करून निवडणूक पार पाडण्यात येणार आहे. निवडणूकविषयक झालेल्या प्रशिक्षणांमध्ये याविषयी सर्वच तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात १९८३ मतदान केंद्र

जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींपैकी २९ ग्रामपंचायती अविराेध झाल्या आहेत. त्यामुळे आता ४९८ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान हाेणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एक हजार ९८३ मतदान केंद्र राहणार आहेत. जिल्ह्यातील १८७ प्रभाग अविराेध झाले. रिंगणातील १० हजार १५१ पैकी ८७५ सदस्य अविराेध झाले असून, जिल्ह्यात नऊ हजार २७६ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.

Web Title: Carina test of 500 employees in the district; Four positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.