काेराेना नियमांचे उल्लंघन, कापड दुकानाला लावले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:33+5:302021-07-10T04:24:33+5:30

डोणगांव : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने, निर्बंधांचे सर्रास उल्लंघन हाेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. ९ जुलै राेजी ...

Carina violates the rules, seals the clothes shop | काेराेना नियमांचे उल्लंघन, कापड दुकानाला लावले सील

काेराेना नियमांचे उल्लंघन, कापड दुकानाला लावले सील

Next

डोणगांव : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने, निर्बंधांचे सर्रास उल्लंघन हाेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. ९ जुलै राेजी सायंकाळी ४ नंतरही सुरू असलेल्या एका कापड दुकानाला मेहकरचे तहसीलदार डाॅ.संजय गरकल यांनी सील लावले.

गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे काेराेनाविषयक नियमांचे दुकानदार आणि ग्राहक सर्रास उल्लंघन करीत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन आणि पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत आहे. ९ जुलैला मेहकरचे तहसीलदार डॉ.संजय गरकल व कर्मचारी हे गोहोगाव येथून परत येत हाेते, यावेळी त्यांना डोणगांव येथे ४ वाजतानंतर ही दुकाने उघडी दिसली. त्यामुळे त्यांनी तलाठी शिवप्रसाद म्हस्के यांना बोलावून घेत, प्रभात फेरी मार्गावर असणाऱ्या कापड केंद्रावर कारवाई करून दुकानाला सील लावले, तसेच पुढील आदेशापर्यंत हे दुकान उघडू नये, असा पंचनाम्यात नमूद केले. यावेळी डोणगांव पोलीस स्टेशनचे पीएसआय शिवाजी राठोड, एएसआय अशोक नरोटे, पवन गाभणे, नितीन खराडे व परसूवाले आदी उपस्थित हाेते. डाेणगावात काेराेना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही सर्वात माेठी कारवाई आहे.

090721\20210709_171504.heic

सिल करताना तहसीलदार व तलाठी

Web Title: Carina violates the rules, seals the clothes shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.