काेराेना रुग्ण घटताच बेफिकिरी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:37+5:302021-06-19T04:23:37+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात गत दाेन आठवड्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, दाेन ...

As Carina's patient declined, so did her anxiety | काेराेना रुग्ण घटताच बेफिकिरी वाढली

काेराेना रुग्ण घटताच बेफिकिरी वाढली

Next

बुलडाणा : जिल्ह्यात गत दाेन आठवड्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, दाेन दिवसांत पाेलीस व नगरपालिकेच्या पथकाने मास्क न लावता, फिरणाऱ्या तब्बल ३०२ लाेकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

एप्रिल मे महिन्यात काेराेनाची दुसरी लाट जिल्हाभरात पसरली हाेती. ग्रामीण भागातही माेठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने, आराेग्य विभागावर ताण वाढला हाेता. तसेच अनेकांना रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले हाेते. काेराेनाचे रुग्ण घटताच, नागरिक एप्रिल, मेमधील परिस्थती विसरल्याचे चित्र आहे. सध्या अनलाॅकची प्रक्रिया सुरू असल्याने, निर्बंध कमी करण्यात आले आहेत. त्याचा गैरफायदा काही नागरिक घेत असल्याचे चित्र आहे. अनेक जण काेराेनाविषयक नियमांचे पालन करीत नसल्याने, तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. जिल्हा सलग दुसऱ्या आठवडा पहिल्या लेव्हलमध्ये असल्याने निर्बंध शिथिल राहणार आहेत. काेराेनाची तिसरी लाट पाहता, नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

पाेलिसांची कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पाेलीस व नगरपालिकेच्या संयुक्त पथकाने कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी विनामास्क फिरणाऱ्या १८७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली हाेती़, तसेच शुक्रवारी आणखी ११५ जणांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुलडाणा शहर पाेलीस स्टेशनचे एपीआय जयसिंग पाटील, ट्राफिक कर्मचारी पैठणे, पवार तथा नगरपालिका कर्मचारी भालेराव, रामोड, कॅमेरामन सरकटे आदींनी केली.

Web Title: As Carina's patient declined, so did her anxiety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.