व्यावसायिकांना काेरोना चाचणी अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:52 AM2021-02-23T04:52:16+5:302021-02-23T04:52:16+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानदार, ऑटोचालक व त्यांचे कर्मचारी यांची ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानदार, ऑटोचालक व त्यांचे कर्मचारी यांची कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी मेहकरमधील किराणा दुकानदार, कापड दुकानदार, हॉटेल, मिठाई दुकानदार, फळे, भाजीपाला, दूध विक्रेता, इलेक्ट्रिकल्स, वाहन विक्री-दुरुस्ती केंद्रातील दुकानदार, ऑटोचालक, वेल्डिंग वर्क्स, कापड दुकानदार, पान टपरी चालक, देशी दारू विक्रेता, वाइन बार, वाइन शॉपी, बीअर शॉपी दुकानदार, सर्व ज्वेलर्स, सर्व आरो प्लांट, पाणीपुरवठा करणारे कर्मचारी, मेडिकल, पॅथॉलॉजी लॅब व सर्व कर्मचारी, चिकन, मटन, अंडी विक्रेता, जनरल स्टेशनरी व दुकानदार यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी या सर्वांना सूचना देऊनही संबंधित दुकानदाराने या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे काेविडचा जास्त प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तत्काळ काेराेना तपासणी करून घेण्यात यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
यापूर्वी दोन वेळा पत्र देऊनही संबंधित दुकानदाराने या आदेशाचे पालन केले नाही. काेरेाना चाचणी करणे बंधनकारक आहे. ही चाचणी न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सचिन गाडे, मुख्याधिकारी, न.प. मेहकर