अहवाल उशिरा येत असल्याने वाढले काेराेना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:30 AM2021-03-15T04:30:27+5:302021-03-15T04:30:27+5:30
धाड परिसरातील चित्र धाड : चाचण्या वाढवण्यात आल्याने काेराेना अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, धाड ...
धाड परिसरातील चित्र
धाड : चाचण्या वाढवण्यात आल्याने काेराेना अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, धाड परिसरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. अनेकजण गावात फिरल्यानंतर त्यांचा अहवाह पाॅझिटिव्ह येत आहे. त्यामुळे, अशा रुग्णांना प्रतिबंध घालण्याची गरज आहे.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर वाढतच आहे. शहरांसह ग्रामीण भागातही काेराेना रुग्ण वाढतच आहे. वाढत्या काेराेना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने काेराेना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. चाचण्या वाढल्या असल्या तरी अहवाल मात्र माेठ्या संख्येचे प्रलंबित राहत आहेत. अहवालही उशिरा येत असल्याने काेराेना संक्रमण वाढत आहेत. प्रशासनाने गावागावात कोरोनाच्या चाचण्या घेण्याची मोहीम हाती घेतली. त्यामुळे असंख्य नागरिकांचे स्वॅब तपासणी करिता अजूनही प्रलंबित आहेत. सध्या आरोग्य प्रशासनाने ग्रामीण भागातील वर्षे ६० आणि त्यापेक्षा अधिक असलेल्या नागरिक व महिलांना आरोग्य केंद्रात मोफत कोरोनाची लस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयात १० मार्चपासून वयस्कर नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
या ठिकाणी दर सोमवारी, बुधवारी,आणि शुक्रवारी या रुग्णालयात वयस्कर नागरिकांना व महिलांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. साधारणत: दोन दिवसांत ग्रामीण रुग्णालयात जवळपास ४० ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाची पहिली लस घेतली आहे. याठिकाणी नागरिकांना लसीकरणानंतर अर्धा तास थांबवून त्यांच्या लसीकरणानंतर काही त्रास होतो काय याची खात्री करुन त्यांना सुटी देण्यात येत आहे. दुपारी ग्रामीण रुग्णालयात धाड येथील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते यासह वयोवृद्ध महिला यांनी कोरोनाची लस घेतली. या रुग्णालयातील डाॅ. ईफरोज तांबोळी, डाॅ. रामेश्वर खरात,सतिष पाटील,सिमा देशपांडे, श्रीमती डांगे
यासह कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत.