बेरोजगारांसाठी नोकर भरती प्रक्रिया राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:32 AM2021-03-25T04:32:45+5:302021-03-25T04:32:45+5:30
देऊळगाव राजा : अलीकडील काळात राज्यात रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून सुशिक्षित बेरोजगारांसाठी समस्या निर्माण होत आहे. राज्य शासनाने ...
देऊळगाव राजा : अलीकडील काळात राज्यात रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून सुशिक्षित बेरोजगारांसाठी समस्या निर्माण होत आहे. राज्य शासनाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासकीय नोकर भरती प्रक्रिया तत्काळ अंमलात आणावी अन्यथा मनसे तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे की महाराष्ट्र राज्यात कोरोना काळात अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत. राज्य शासकीय नोकर भरती गत दोन वर्षापासून अडकली आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बेरोजगार युवकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शैक्षणिक योग्यता असूनही असंख्य युवक रोजगाराअभावी ताणतणावाच्या परिस्थितीत जगत आहे. शासनाने सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगाराची समस्या मार्गी लावण्यासाठी राज्य शासकीय नोकर भरती प्रक्रिया तत्काळ अंमलात आणावी व युवकांना रोजगार द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेधार्थ तीव्र आंदोलन उभे करील, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. तहसीलदार यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष राजू मांटे ,जिल्हा उपाध्यक्ष बाळराजे देशमुख ,शहराध्यक्ष सय्यद नईम, प्रकाश बस्सी, शहजाद भाई, विकास आंधळे, कैलास पवार, विनोद ठोकळ, शुभम बंगाळे, शरद काकडे, दिनेश सोळंके, अमोल नागरे, अनिल धांडे, यश कासारे, अजय आंधळे आदींची उपस्थिती होती.