बँकेत नकली नोटांचा भरणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2017 03:21 AM2017-02-18T03:21:51+5:302017-02-18T03:21:51+5:30

पोलिसांनी १७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. .

In the case of payment of fake notes in the bank, the case is filed | बँकेत नकली नोटांचा भरणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बँकेत नकली नोटांचा भरणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next

खामगाव, दि. १७- १९ डिसेंबर १६ पुर्वी स्टेट बँकेत १ हजार व ५00 रूपयांच्या नकली नोटांचा भरणा केल्याचे उघडकीस आल्यावरून अज्ञात नकली नोटांचा भरणा करणार्‍या आरोपीविरूद्ध शहर पोलिसांनी १७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. . येथील भारतीय स्टेट बँक शाखेत एक हजार रुपयाच्या दोन व पाचशे रुपयाच्या २४ नकली नोटा अज्ञात इसमाने १९ डिसेंबरपुर्वी खात्यात जमा केल्या. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेचे विशेष सहायक अधिकारी विजय निंबोळकर यांनी १७ फेब्रुवारी रोजी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध कलम ४८९ (अ), (ब), (क), (ड), (ई) भादंविनुसार गुन्हा दाखल केला. सदर प्रकार नोटाबंदी दरम्यान घडला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: In the case of payment of fake notes in the bank, the case is filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.