खामगाव येथील दीडशे आंदोलकांवर गुन्हे दाखल, पोलिसांशी अरेरावी भोवली

By अनिल गवई | Published: January 2, 2024 11:19 AM2024-01-02T11:19:34+5:302024-01-02T11:20:50+5:30

 आरोपींमध्ये महिलांचा समावेश

cases filed against 150 protestors in khamgaon clash with police | खामगाव येथील दीडशे आंदोलकांवर गुन्हे दाखल, पोलिसांशी अरेरावी भोवली

खामगाव येथील दीडशे आंदोलकांवर गुन्हे दाखल, पोलिसांशी अरेरावी भोवली

अनिल गवई, खामगाव: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी खामगाव येथे ट्रॅक्टर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांशी अरेरावी करणे चांगलेच अंगलट आल्याचे दिसून येते. शासनविरोधी घोषणाबाजी आणि पोलिसाशी अरेरावी केल्याप्रकरणी  महिलांसह पोलिसांनी दीडशे आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

तक्रारीनुसार , शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी गाव येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याची गुप्त माहिती खामगाव पोलिसांना मिळाली होती. संबंधित आंदोलकांना पोलिसांनी जमावबंदी तसेच नुसार नोटीस दिली होती. तरीही आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करीत मोर्चा काढला. दरम्यान शासन विरोधी घोषणाबाजी तसेच पोलिसांशी अरेरावी केली. त्यामुळे शहर पोलिसांनी पोहेका गोपाल सातव यांच्या तक्रारीवरून  शिवराज उर्फ रावसाहेब टीकार पाटील , शिवाजीराव उर्फ रावसाहेब टीकार पाटील यांची पत्नी, संदीप शिवाजीराव टीकार पाटील, बाळू शिवाजीराव टीकार पाटील,बाळू खरात, मारुती तायडे,आनंद सुरवाडे,गणेश ठाकरे, ज्ञानेश्वर टीकार, हिम्मत सुरवाडे सर्व रा. बोरी अडगांव ता. खामगाव, श्याम अवताडे रा. पिंपरी गवळी यांच्या विरोधात भादवी कलम ३४१,२९४,१८६,३४ आणि म पोका १३५ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: cases filed against 150 protestors in khamgaon clash with police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.