श्रावण बाळ योजनेची प्रकरणे वर्षभरापासून प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:50+5:302021-04-03T04:30:50+5:30
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, बुलडाणाचे प्रशासक नीलेश देठे, शिवाजीराव पालकर, राष्ट्रवादी कामगार ...
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, बुलडाणाचे प्रशासक नीलेश देठे, शिवाजीराव पालकर, राष्ट्रवादी कामगार सेलचे तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सरचिटणीस महेंद्र कड आदींची उपस्थिती होती.
बुलडाणा तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेमध्ये पात्र लाभार्थींनी गेल्या १२ महिन्यांपासून ऑनलाईन अर्ज करून ७०० ते ८०० लाभार्थींनी फाईल तहसील कार्यालयात जमा केलेल्या आहेत. ४०० ते ५०० लाभार्थी ऑनलाईन अर्ज करूनही तहसील कार्यालयात दररोज चकरा मारत आहेत. त्यांच्याकडील फाईल जमा करून घेतल्या जात नाहीत, ही बाब वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेली असतानाही प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जात आहे. या विभागातील सक्रिय दलालांचा बंदोबस्त करून सामान्य माणसासाठी असणारी ही योजना त्यांच्यापर्यंत विना विलंब पोहोचविण्याची व्यवस्था करावी व १२ महिन्यांपासून निकाली न निघालेल्या फाईल १० एप्रिल २०२१ च्या अगोदर निकाली काढाव्यात, अन्यथा १५ एप्रिल रोजी कोविड १९ संसर्गाचा विचार न करता तालुक्यातील महिला पुरुष लाभार्थींसह तहसील कार्यालयात मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मनोज दांडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.