कास्ट्राइबचे कृष्णा इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:44 AM2017-10-24T00:44:56+5:302017-10-24T00:46:59+5:30
पिंपळगाव राजा: वसाडी येथील एका ३५ वर्षीय दलित महिलेच्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्यावर पिंपळगावर राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर कृष्णा इंगळे हे फरार झाले असून, पिं पळगाव राजा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव राजा: वसाडी येथील एका ३५ वर्षीय दलित महिलेच्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्यावर पिंपळगावर राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर कृष्णा इंगळे हे फरार झाले असून, पिंपळगाव राजा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील वसाडी येथील महिलेच्या चारित्र्याविषयी शासन व प्रशासन दरबारी बनावट नावाने दिलेल्या तक्रारी पिंपळगाव राजा पोलिसांकडे चौकशीकरिता प्राप्त झाल्या असता सदर तक्रारी खोट्या असल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली. त्याबाबत वसाडी येथे कृष्णा धना इंगळे यांना सदर महिलेने संपूर्ण गावकर्यांसमोर जबाब विचारला असता कृष्णा इंगळे यांनी या महिलेला सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करून तिच्या चारित्र्याविषयी अपशब्द वापरले. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेची तक्रार पीडित महिलेने पिंपळगाव राजा पोलिसात दिली. त्यावरून आरोपी कृष्णा इंगळे यांच्याविरुद्ध कलम २९४, ३२३, ५0४, ५0६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कृष्णा इंगळे यांना अटक करण्यासाठी ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी विशेष पथक तैनात केले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
लवकरच कृष्णा इंगळे यांना अटक करणार असल्याचा दावा ठाणेदार अहेरकर, पोहेकाँ नवृत्ती बाठे यांनी केला आहे.